Twitter : तुमच्यासाठी नोकरीची जोरदार संधी, पण तुम्ही जाणार का? कर्मचारी कपातीनंतर ट्विटरने उघडली दारे..भरतीचा बिगूल वाजला..

Twitter : ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी आता एक अजब घोषणा केली आहे..

Twitter : तुमच्यासाठी नोकरीची जोरदार संधी, पण तुम्ही जाणार का? कर्मचारी कपातीनंतर ट्विटरने उघडली दारे..भरतीचा बिगूल वाजला..
ट्विटरमध्ये नोकरीची संधीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 10:01 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) मालकी मिळविल्यानंतर जो काही गोंधळ घातला की, अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. अनेकांच्या नोकऱ्या (Lay Off) गेल्याने ते बेरोजगार झाले. ट्विटरमध्ये तर काही जणांनी तर अवघ्या काही दिवसांची सेवा बजावली होती. पण मस्क यांनी बऱ्याच कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्याच मस्क यांनी आता ट्विटरचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत..

तर मस्क यांच्या निर्णयामुळे ट्विटरमधील 7500 कर्मचाऱ्यांपैकी 2700 कर्मचारीच उरले. हा ताण असह्य होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी ही एका मीटिंगमध्ये सामुहिक राजीनामे दिले. त्यामुळे मस्क यांचा तोरा एकदम उतरला.

मस्क यांनी ट्विटरचा डोलारा सांभाळण्यासाठी कर्मचारी भरतीला हिरवा कंदिल दाखविला आहे. मस्क यांनी कंपनीत एंट्री केल्यापासून मोठ्या पदावरील अनेक दिग्गजांना फटका बसलेला असताना, आता मस्क यांनी कर्मचारी भरतीचा बिगूल वाजवला आहे.

हे सुद्धा वाचा

मीडिया अहवालानुसार, सोमवारी मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानुसार इंजिनिअरिंग आणि मार्केटिंग पदासाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांना या पदासाठी मित्रांच्या नावाची शिफारसही करता येणार आहे.

अजून भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ट्विटरच्या संकेतस्थळावर या भरतीविषयीची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, कर्मचाऱ्यांमध्ये या भरतीची माहिती देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मस्क हे ट्विटरचे मुख्य कार्यालय टेक्सासमध्ये सुरु करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी टेस्ला कंपनीच्या बाबतीत हाच निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ट्विटरच्या कार्यालयाविषयी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.