UID: तुम्ही देखील करता का आधार संबंधित या चुका? UIDAI ने केले आहे सावध!

आधार कार्डशी संबंधित अनेक जण काही चुका करतात. विशेष म्हणजे याबद्दल त्यांना माहिती देखील नसते. जाऊन घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्या सर्वसामान्यपणे केल्या जातात.

UID: तुम्ही देखील करता का आधार संबंधित या चुका? UIDAI ने केले आहे सावध!
आधार कार्ड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 8:32 PM

मुंबई,  आज आधार कार्ड हे ओळख पटवून देण्यासाठीचे  सर्वात मोठे दस्तावेज बनले आहे. एखाद्याची ओळख प्रमाणित करण्यासाठी ते ऑफलाइन किंवा ऑनलाइन वापरले (Use Of Aadhar) जाऊ शकते. पण, ते वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी (Tips for security) लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार वापरताना काय करावे आणि काय करू नये हे स्पष्ट करणारे परिपत्रक जारी केले आहे.

प्रत्येक कामात आधारचा वापर

बँकेत खाते उघडायचे असो, शाळा-कॉलेजात प्रवेश घ्यायचा असो, फोन सिम घ्यायचा असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, सगळीकडे त्याची गरज असते. पण तुमचे आधार कार्ड वापरताना काळजी घेण्याची गरज आहे, थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो.

कुठे वापराल आधार?

आधार ही तुमची डिजिटल ओळख आहे. जेव्हा जेव्हा ओळख सिद्ध करायची असते तेव्हा आधार कार्ड यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

हे सुद्धा वाचा

एखाद्या कामासाठी आधार क्रमांक देताना मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, UAN शेअर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

ज्या कामासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड शेअर करत आहात, तेथे तुमची संमती अनिवार्यपणे घेतली जाईल. आधार कार्डची प्रत देताना त्यावर संबंधित कामाचा उल्लेख अवश्य करावा.

तुम्हाला तुमचा आधार क्रमांक शेअर करायचा नसेल, तर तुम्ही त्याऐवजी UIDAI द्वारे प्रदान केलेला व्हर्च्युअल आयडी (VID) वापरू शकता. हे जनरेट करणे खूप सोपे आहे आणि आधार क्रमांकाने बदलले जाऊ शकते.

सामान्यतः लोक आधार कार्ड किंवा नंबर जिथे आवश्यक असेल तिथे देत असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही एम-आधार ॲप किंवा UIDAI वेबसाइटवर वेळोवेळी प्रमाणीकरण इतिहास तपासत राहणे फार महत्वाचे आहे. या ठिकाणी मागील 6 महिन्यात तूंच आधार क्रमांक कुठे आणि कोणत्या कामासाठी वापरला गेला याचा सहा  महिन्यांचा आधार इतिहास उपलब्ध असतो.

तुमचा आधार ईमेलसोबत लिंक करा. कारण UIDAI आधार प्रमाणीकरणाची माहिती ईमेलद्वारे देखील प्रदान करते. यासह, जेव्हा जेव्हा आधार प्रमाणीकृत होईल तेव्हा त्याची माहिती ईमेलद्वारे तुमच्यापर्यंत येईल. याशिवाय, OTP आधारित आधार प्रमाणीकरण वापरण्यासाठी आधारमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर नेहमी अपडेट ठेवा.

UIDAI आधार लॉकिंग आणि बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधा प्रदान करते. जर तुम्ही बराच काळ आधार वापरत नसाल तर तुम्ही आधार किंवा बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा ते अनलॉक करा.

आधारचा गैरवापर झाल्यास, तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर 24X7 तक्रार करू शकता. किंवा तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी help@uidai.gov.in देखील वापरू शकता.

या चुका कधीही करू नका

  1. तुमचे आधार कार्ड आणि त्याच्या अनावश्यक प्रति काढून ठेऊ नका. जरी काढल्या तरी त्या जपून ठेवाव्या.
  2. जिथे गरज नाही तेही आधार नंबर देणे टाळा
  3. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे आधार कार्ड शेअर करणे टाळा. असे केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
  4. याशिवाय कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेला आधार ओटीपी कधीही शेअर करू नका. एम-आधार कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....