Aadhaar Card : तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना! कसं जाणून घ्यायचं? इथे वाचा सविस्तर…
'आधार'बद्दलची एक चांगली गोष्ट म्हणजे त्याचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळते. UIDAI एजन्सीने आधारच्या संरक्षणासाठी विविध प्रणाली विकसित केली आहे. जेणेकरून तुमच्या आधारचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.
आधार कार्ड आजच्या काळात खूप महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहेत. त्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. आधार कार्डचे (Aadhaar Card) महत्त्व या गोष्टीवरून समजू शकते, की आता ते केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर मुलांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलाकडे आधार कार्ड नसेल तर शाळेत प्रवेश (School Admission) घेताना अनेक अडचणी निर्माण होतात. याशिवाय आधारशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा (Government Schemes) लाभही घेऊ शकत नाही. आधारचे महत्त्व पाहता त्याचा गैरवापर होण्याचा धोकाही वाढतो. पण आधारबाबत एक एक उत्तम गोष्ट म्हणजे त्याचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची माहिती तुम्ही वेळोवेळी मिळवू शकता. ‘आधार’च्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम UIDAIच्या https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
आधारचा होऊ शकतो गैरवापर
आपल्या सर्वांना माहित आहे, की आधार कार्डमध्ये आपले नाव, पत्ता, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि फोटो तसेच बोटांचे ठसे आणि डोळ्यांची ठेवण याच्या खुणा आहेत. अशा परिस्थितीत आपल्या आधार कार्डचा कोणी गैरवापर तर करू शकत नाही ना, अशी भीती अनेकांना वाटत असते. जर तुम्हालाही आधार कार्डची सुरक्षा आणि गैरवापराबद्दल चिंता असेल तर तुम्ही आधार संकेतस्थळाला भेट देऊन गेल्या 6 महिन्यांत आधार कार्डच्या वापराबद्दल माहिती घेऊ शकता. UIDAIच्या संकेतस्थळावर तुम्हाला आधारचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची संपूर्ण माहिती मिळते.
कसा तपासणार आधारचा दुरुपयोग?
– तुमच्या ‘आधार’च्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम UIDAIच्या https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. – आता खाली या आणि आधार सर्व्हिसेसवर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. – नव्या पेजवर आल्यावर ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचा पर्याय दिसेल, तिथे क्लिक करावे लागेल. – ऑथेंटिकेशन हिस्ट्री पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. – आता सेंड ओटीपीवर क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर 6 अंकी ओटीपी असणार आहे. – 6 अंकी ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. – माहिती भरून ओटीपीची पडताळणी करण्यासाठी व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक करा. – व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री तुमच्या स्क्रीनवर दिसेल. कुठे गेल्या 6 महिन्यात तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले हे तुम्हाला पाहता येणार आहे.
पूर्णपणे मोफत
https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरण तपासणे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. UIDAIच्या संकेतस्थळावर या आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI एजन्सीने आधारच्या संरक्षणासाठी विविध प्रणाली विकसित केली आहे. जेणेकरून तुमच्या आधारचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.