Unemployment : ऑक्टोबरमध्येही तरुणांच्या हाताला नाही काम, मेहनतीला तयार, पण कोणी देईना नोकरी आणि दाम..
Unemployment : देश अनेक क्षेत्रात झेप घेत असताना, बेरोजगारीवर मात्र उपाय सापडत नसल्याचे चित्र आहे..
नवी दिल्ली : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) अनुसार, खरीपानंतर देशात बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात देशातली बेरोजदारीचा वृद्धी दर जास्त होता. ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारीचा (Unemployment) दर 7.77 टक्क्यांवर पोहचला. सप्टेंबर महिन्यात हा दर गेल्या चार वर्षांत सर्वात कमी स्तरावर होता.
सप्टेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर 6.43 टक्के होता. त्यानंतर एकाच महिन्यात या दरात एका टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. ग्रामीण भागात बेरोजगारीची (Rural Unemployment Rate) समस्या सर्वाधिक असल्याचे आकड्यावरून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर सप्टेंबर महिन्यात 5.84 टक्के होता. ऑक्टोबर महिन्यात या दरात भयानक वाढ झाली. हा दर ऑक्टोबर महिन्यात 8.04 टक्क्यांवर गेला. त्यामुळे सरकारला ग्रामीण भागात रोजगार पुरविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढला नाही तर कमी झाला. शहरी भागातील बेरोजगारीचा दर 7.21 टक्क्यांहून 7.7 टक्क्यांवर आला. शहरी भागात अनेक अनेक लघु उद्योगांमध्ये वाढ झाल्याने तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.
खरीप पीक साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हाती येते.या सहा महिन्यात अनेक प्रकारची कामे ग्रामीण भागात सुरु असतात. त्यामुळे बेरोजागारीचा आकडा कमी असतो. पण यंदा पावासाने दाणादाण उडवली.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारी दरात कमालीची घट दिसून आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 7.91 टक्क्यांहून घसरून 6.41 टक्के घसरला होता.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आकड्यानुसार, ऑगस्ट 2022 मध्ये 1.69 नवीन सदस्य संघटनेत दाखल झाले आहेत. यातील 0.99 टक्के सदस्य पहिल्यांदाच संघटनेशी संलग्नित झाले. यामधील 58.32 टक्के सदस्य 18 ते 25 वयोगटातील आहेत.