Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची पुन्हा संधी; सरकारने वाढवली मुदत

Aadhaar Card Update : दहा वर्षे जुने आधार कार्ड नागरिकांना मोफत अपडेट करता येईल. देशातील कोट्यवधी जनतेला मोदी सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. आता या तारखेपर्यंत त्यांना आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. पूर्वी ही तारीख 14 जून, 2024 ही होती.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची पुन्हा संधी; सरकारने वाढवली मुदत
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यास मुदत वाढ
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 11:34 AM

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत दाखल झाले आहे. सत्तेत येताच जनतेला एक दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली. गेल्या काही वर्षांपासून ही मुदत सातत्याने वाढविण्यात येत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट, वीजेचा लपंडाव पाहता मुदत वाढ दिली असेल. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खर्च करावा लागणार नाही. आधार कार्डला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर ते तात्काळ अद्ययावत करणे आवश्यक आहे.

काय आहे तारीख

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख 14 मार्च होती. त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही डेडलाईन जवळ येताच पुन्हा एकदा मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला. आता आधार कार्ड धारकांना 14 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे, याविषयीची माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) दिली आहे. नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन सुविधेचा लाभ घेता येईल. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर अपडेट करण्यासाठी ही संधी आहे.

हे सुद्धा वाचा

असा करा बदल

या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.

10 वर्षें झाल्यास करा बदल

आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

असे करा आधार कार्ड अपडेट

UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा

अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा

12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा

ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा

आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा

‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

ऑफलाईन असे करा अपडेट

https://shuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत पोर्टलवर जा

आता जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी ‘निअर बाय सेंटर’ वर क्लिक करा

तुमचा योग्य पत्ता द्या. लोकेशन व्हेरिफिकेशन होऊन जवळचे केंद्र सापडेल

पिन कोड टाकून सुद्धा तुम्हाला जवळचे आधार केंद्र सापडेल

'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.