आयडीबीआय बँकेचे केवायसी अपडेट करणे झाले आणखी सोपे; जाणून घ्या नेमकी काय आहे प्रक्रिया

आयडीबीआय बँकेने यासंदर्भात संपूर्ण तपशील दिलेला आहे, जेणेकरुन ग्राहक डिजिटल किंवा ऑनलाइन मोडद्वारे केवायसी अपडेट करु शकतील. (Updating IDBI Bank's KYC became even easier; know exactly what the process is)

आयडीबीआय बँकेचे केवायसी अपडेट करणे झाले आणखी सोपे; जाणून घ्या नेमकी काय आहे प्रक्रिया
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 8:19 PM

नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेने केवायसी अपडेटसंदर्भात आपल्या ग्राहकांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बँकिंग संबंधित सेवांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी केवायसी अपडेट करण्याच्या सूचना बँकेने दिल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी लोकांना बँकेच्या शाखेत येण्यास सांगितले जात आहे. एकमेकांशी थेट संपर्क न ठेवताही केवायसी अपडेटचे काम करता येते. यासाठी आयडीबीआय बँकेने डिजिटल माध्यमांची मदत घेण्यास सांगितले आहे. या ऑनलाइन पद्धतींद्वारे आपण केवायसीचे काम सहजपणे पूर्ण करू शकता आणि बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. आयडीबीआय बँकेने यासंदर्भात संपूर्ण तपशील दिलेला आहे, जेणेकरुन ग्राहक डिजिटल किंवा ऑनलाइन मोडद्वारे केवायसी अपडेट करु शकतील. (Updating IDBI Bank’s KYC became even easier; know exactly what the process is)

1. तुम्ही केवायसीचे काम एसएमएसद्वारेही करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेकडे नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावरुन 9820346920 या क्रमांकावर RKYC लिहून मेसेज पाठवावा लागेल. सुरुवातीला बँकेतून एक मेसेज येतो. त्यानंतर हा मेसेज पाठवावा लागतो.

2. बँकेकडून प्राप्त झालेल्या मेसेजमध्ये एक लिंक असते, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावा लागेल. बँकेकडून मेसेजऐवजी नोंदणीकृत मेल आयडीवर मेलही पाठवला जाऊ शकतो, त्या मेलमध्ये लिंक देण्यात येते.

3. केवायसी अपडेट करण्याची सुविधा इंटरनेट बँकिंगमध्येही उपलब्ध आहे. येथे सर्व्हिस अँड रिक्वेस्ट वर जा आणि नेटबँकिंगवर क्लिक करा.

4. ग्राहकांची इच्छा असल्यास ते व्हिडिओ-केवायसीदेखील करू शकतात. ही लिंक बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तेथे व्हिडिओ लिंकची संपूर्ण प्रक्रियादेखील सांगितली जाते.

जे वैयक्तिक नसलेले खातेदार (नॉन-इंडिविज्युअल) आहेत, ते ग्राहक केवायसीच्या नवीन कागदपत्रांच्या अपडेटसाठी www.idbibank.in वर भेट देऊ शकतात. यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतील आणि कोणती प्रक्रिया असेल याची माहिती या वेबसाइटवर देण्यात आली आहे. बँकेने ग्राहकांना विनंती केली आहे की केवायसी अपडेट करताना त्यांनी पॅन तपशील, मोबाईल व ई-मेल आयडीदेखील बँक खात्यात प्रविष्ट करावेत, जेणेकरून नंतर हे काम स्वतंत्रपणे करावे लागणार नाही. तसेच, सर्व काही अपडेट केल्यामुळे बँकिंग प्रक्रिया सुलभ होते.

ही कागदपत्रे सादर करावी लागतात

केवायसी अपडेट करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची असतात. आधीपासून त्याची स्कॅन केलेली प्रत सोबत ठेवणे सोईचे होईल, जेणेकरून ऑनलाइन प्रक्रिया अधिक सुलभ होईल. केवायसी अपडेटसाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील ते जाणून घ्या-

– पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 – पासपोर्ट प्रत – निवडणूक आयडी किंवा मतदार आयडी – चालक परवाना – नरेगा कामाचे कार्ड – राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) द्वारा जारी केलेले पत्र – आधार कार्ड

जर ग्राहकांना ऑनलाइन काम करण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तो बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकेल. तुम्ही 1800 209 4324, 1800 22 1070, 022 67719100 वर टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. ग्राहकांची इच्छा असल्यास ते www.idbibank.in या ई-मेल आयडीवर मेल पाठवू शकतात. (Updating IDBI Bank’s KYC became even easier; know exactly what the process is)

इतर बातम्या

तुम्हीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? मग पुढील महिन्यापासून अधिक टीडीएस देण्यास तयार रहा

Photo : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.