Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI ATM | विना कार्ड मोबाईलच्या मदतीने काढा कॅश, असे उपयोगी पडते हे तंत्रज्ञान

PI ATM | देशातील पहिले युपीआय एटीएम कार्ड सुरु होऊन अनेक महिने झाले. डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून यामुळे ग्राहकांची सूटका होणार आहे. राष्ट्रीय देयके महामंडळाच्या सहकार्याने हे पाऊल टाकण्यात आले आहे. त्यामुळे केवळ मोबाईलच्या मदतीने तुम्ही एटीएममधून कॅश काढू शकाल. देशभरात लवकरच युपीआय एटीएम जागोजागी सुरु होतील.

UPI ATM | विना कार्ड मोबाईलच्या मदतीने काढा कॅश, असे उपयोगी पडते हे तंत्रज्ञान
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : एटीएमवर रोख रक्कम काढायला गेलात आणि डेबिट कार्ड घरी विसरलात तरी हरकत नाही. लवकरच तुम्ही विना ATM Card रोख रक्कम काढू शकता. देशात व्हाईट-लेबल युपीआय एटीएमची अगोदरच सुरुवात झाली आहे. या सुविधेमुळे कार्डलेस कॅश विड्रॉल म्हणजे विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. युपीआय एटीएमच्या (UPI ATM) मदतीने रक्कम काढता येईल. अर्थात यामुळे एटीएमवर डेबिट कार्डच्या (Debit Card Fraud) माध्यमातून फसवणूक होणार नाही. युपीआय पेमेंटच्या सहायाने रक्कम काढता येईल. राष्ट्रीय देयके महामंडलाच्या (NPCI) सहकार्याने ही योजना देशभर राबविण्यात येत आहे.

कशी काढाल रक्कम

तुम्हाला रोख रक्कमेची गरज आहे आणि एटीएममधून पैसे काढायचे असतील तर आता मोबाईल मदतीला धावेल. एटीएम मशीनवर एक क्युआर कोड असेल. तुमच्या मोबाईलमधील युपीआय पेमेंट एपच्या मदतीने रोख रक्कम काढता येईल. त्यासाठी एटीएमवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. QR Code स्कॅन करताच कार्डलेस कॅश एटीएममधून बाहेर येईल.

हे सुद्धा वाचा

कार्ड स्किमिंगचा धोका नाही

कार्डलेस कॅश विड्रॉलमुळे कार्ड स्किमिंगचा धोका कमी होईल. डेबिट कार्ड एटीएममध्ये टाकल्यावर सायबर भामटे कार्ड क्रमांक आणि पिन चोरतात आणि खात्यातील रक्कमेवर हात साफ करतात. यामध्ये डेबिट वा क्रेडिट कार्डचा प्रत्यक्ष वापर होणार नाही. त्यामुळे कार्ड स्किमिंगसारखी फसवणूक होणार नाही.

फॉलो करा या स्टेप्स पाच

  • UPI एप्लिकेशनच्या माध्यमातून नोंदणीकृत व्यक्ती युपीआय-एटीएमचा उपयोग करु शकते.
  • सर्वात अगोदर एटीएमवर जाऊन UPI Cardless Cash/QR Cash हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमची रक्कम नोंदवा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
  • रक्कम टाकल्यानंतर एटीएम मशीनवर एक क्युआर कोड येईल.
  • हा क्युआर कोड Paytm, PhonePe, GooglePay वा इतर UPI एपच्या मदतीने स्कॅन करा
  • त्यानंतर युपीआय पिन टाका. प्रक्रिया पूर्ण होताच रक्कम बाहेर येईल.

किती काढता येईल रक्कम

युपीआयच्या माध्यमातून एटीएममधून एकावेली केवळ 10 हजार रुपये काढता येतील. युपीआय पेमेंटमुळे वापरकर्त्याला विविध बँकेचे एटीएम कार्ड ठेवण्याची गरज उरली नाही. एकूणच या सुविधा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणताही एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तरच युपीआय पेमेंट होऊ शकेल.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.