UPI Payment : युपीआय पेमेंटमध्ये अपडेट! RBI ने वाढवली मर्यादा
UPI Payment : UPI पेमेंट लाईट ॲपच्या माध्यमातून आता अधिक पेमेंट करता येईल. आरबीआयने काही महत्वाचे बदल केले आहे. त्यानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवहारात हा बदल झाला आहे. युझर्सला त्याचा असा फायदा होईल.
नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : भारतात 5 जीचे वारे वाहत आहे. इंटरनेटमध्ये मोठी क्रांती होणार आहे. भारतात अधिक वेगाने इंटरनेट सुविधा मिळेल. पण देशातील अनेक गावात, पाड्यात, दुर्गम भागात आजही नेटवर्कची समस्या आहे. अनेक ठिकाणी 2 जीची सेवा मिळते. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खास सुविधा आणलेली आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्याला नेटवर्क नसताना पण युपीआय पेमेंट करता येणार आहे. त्यासाठी युपीआय लाईट वॅलेटची (UPI-Lite wallet) सोय सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्राहकांना जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येत होता. पण गुरुवारी RBI ने ही मर्यादा वाढवली. हा मर्यादा आता 500 रुपये करण्यात आली आहे.
इंटरनेट नाही अडथळा
इंटरनेट नसले तरी आता ग्राहकांना त्यांच्या युपीआय लाईटच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. युपीआय लाईट वॅलेटच्या माध्यमातून 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येते. त्यासाठी ना पिनची गरज आहे ना कोणत्याही पडताळणीची आवश्यकता आहे. तसेच नेटवर्क कमजोर असले अथवा नसले तरी भागते. तुम्हाला UPI-Lite wallet च्या माध्यमातून ऑफलाईन पेमेंट करता येईल.
आरबीआयने वाढवली मर्यादा
कोणत्याही पेमेंट प्लॅटफॉर्मवर युपीआय-लाईट माध्यमातून एकूण 2,000 रुपयांच्या रक्कमेचा व्यवहार करता येईल. RBI ने ऑफलाईन माध्यमातून किरकोळ पेमेंटसाठी डिजिटल पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. याविषयीचे परिपत्रक आरबीआयने जारी केले आहे. ऑफलाईन पेमेंट व्यवहाराची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
एक कोटींहून अधिकचे व्यवहार
इंटरनेट सुविधेपासून वंचित मोबाईल धारकांसाठी UPI-Lite चा प्रयोग करण्यात आला होता. ऑफलाईन ट्रान्झॅक्शनची सुविधा सप्टेंबर, 2022 मध्ये सुरु करण्यात आली होती. युपीआय लाईट या प्लॅटफॉर्मवरुन ही सुविधा देण्यात आली. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवरुन केवळ 200 रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. बेसिक मोबाईल असणाऱ्यांमध्ये युपीआय पेमेंट लाईट लोकप्रिय झाले. या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक कोटींहून अधिक युझर्सने व्यवहार पूर्ण केला आहे.
UPI-Lite चा वापर वाढला
UPI-Lite चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. आरबीआयने ऑगस्टच्या सुरुवातीलाच NFC तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑफलाईन व्यवहार देण्याची सुविधा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. NFC तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवहार करताना पिन व्हेरिफिकेशनची गरज नसते.
ई-वॅलेटचा पर्याय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 20 सप्टेबर 2022 रोजी युपीआय लाईट ॲपचे उद्धघाटन केले होते. काही छोटे व्यवहार या माध्यमातून पूर्ण करता येतील. विनाइंटरनेट हा व्यवहार पूर्ण होणार आहे. त्यासाठी केवळ ॲप उघडायचं आणि पेमेंट करायचे आहे. ॲपच्या सहाय्याने कोणालाही छोट्या रक्कमेचा व्यवहार पूर्ण करता येईल. या ई-वॅलेटच्या मार्फत तुम्ही 500 रुपयांपर्यंतचा व्यवहार विना पिन, विना इंटरनेट आणि विना स्मार्टफोन द्वारे तात्काळ करु शकता.