UPI Payments : मोठी अपडेट! प्री-अप्रुव्ह कर्जावर सुद्धा करा युपीआय व्यवहार
UPI Payments : युपीआय पेमेंटवर मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत बँकेत असलेल्या खात्यातील रक्कमेवर व्यवहार करता येत होता. आता अगोदरच मंजूर कर्जावर सुद्धा ग्राहकांना व्यवहार करता येणार आहे. ग्राहक प्री-अप्रुव्ह, प्री सॅक्शन्ड कर्जावर, क्रेडिटवर युपीआय पेमेंट करु शकतील.
नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : देशात युपीआय पेमेंट महत्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच वर्षांत यामध्ये ठळक बदल झाले आहेत. युपीआयवर देशातील नागरिकांचा विश्वास वाढला आहे. देशातील 5 स्टार हॉटेलपासून ते गल्लीबोळातील फिरस्थ विक्रेत्यापर्यंत सर्वच जण युपीआय पेमेंट (UPI Payment) कोडचा वापर करत आहे. डिजिटल पेमेंटकडे भारताने मोठी झेप घेतली आहे. युपीआय पेमेंटचा परीघ सुद्धा वाढला आहे. सुविधांमध्ये वाढ होत आहे. रुपी कार्ड, क्रेडिट कार्ड यांना जोडण्याची सुविधा दिल्यानंतर ग्राहकांना आता आणखी एक सुविधा देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी याविषयीची घोषणा केली . त्यानुसार युनिफाईड पेमेंट इंटरफेस सिस्टमच्या माध्यमातून (UPI New Facility) ग्राहकांना सहज व्यवहार करता येईल. अगोदरच मंजूर कर्जावर (Pre Approved Loan) व्यवहार करणे सोपे होणार आहे.
ग्राहकांचा काय फायदा
आतापर्यंत युपीआय पेमेंट केवळ खात्यातील जमा रक्कमेवर करता येत होते. सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्डशी युपीआय संलग्नित आहे. आता आरबीआयने पूर्व मंजूर कर्जाचा व्यवहार सुद्धा युपीआय पेमंटच्या परीघात आणला आहे. प्रीअप्रुव्ह कर्जावर युपीआय सिस्टमचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. त्यामुळे ग्राहकांना बाजारात कोणतेही उत्पादन खरेदी करण्यासाठी झटपट मदत मिळेल. तसेच मित्रांना तात्काळ मदत पण करता येईल. बँका, वित्तीय संस्था यामध्ये ऑफर आणून ग्राहकांना आकर्षीत करतील.
कसे करेल हे काम
RBI ने या सुविधेची माहिती दिली. अगोदरच मंजूर कर्जाववर व्यावसायिक बँका ग्राहकांना क्रेडिट इश्यू करु शकतील. पण त्यासाठी ग्राहकांना अगोदर बँकांकडून याविषयीची मंजूरी घ्यावी लागेल. या नवीन सुविधाचा वापर करुन ग्राहक त्यांचे व्यवहार पूर्ण करु शकतील. या सुविधेमुळे काही दिवसांनी क्रेडिट कार्ड अथवा कार्डवर खरेदीची गरज कितपत राहिल, हा प्रश्न समोर येत आहे.
ऑगस्ट महिन्यात युपीआयने केला रेकॉर्ड
ऑगस्ट महिन्यात UPI ने रेकॉर्ड केला आहे. युपीआय व्यवहार या महिन्यात 10 अब्जाचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. जुलै महिन्यात युपीआय व्यवहाराचा आकडा 9.96 अब्जावर होता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या अपडेटवर आनंद व्यक्त केला. युपीआय, डिजिटल पेमेंटमध्ये महत्वाचा भाग झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील कोट्यवधी लोक युपीआयच्या माध्यमातून झटपट व्यवहार करत आहेत. गल्ली ते दिल्ली युपीआयचा डंका आहे. आता परदेशातही युपीआय पेमेंटची सुविधा सुरु झाली आहे.