UPI New Facilit : क्रेडिट नसेल तरी ऑनलाईन घेता येणार उधार, कसं ते जाणून घ्या!
तुम्ही आत्तापर्यंत शॉपिंग करताना लगेच पेमेंट केलं असेल. पण आता तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग ही उधारीवरही करता येणार आहे.
मुंबई : सध्याच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजकाल कोणतीही वस्तू घ्यायचं म्हटलं की प्रत्येकजण ऑनलाइन शॉपिंग किंवा ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर देतात. तर अशाच ऑनलाइन शॉपिंग प्रेमींसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्ही आत्तापर्यंत शॉपिंग करताना लगेच पेमेंट केलं असेल. पण आता तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग ही उधारीवरही करता येणार आहे.
आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करताना क्रेडिट कार्डचा वापर केला असेल. पण आता तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज पडणार नसून तुम्ही क्रेडिट लाइन वापरू शकता. येत्या काही दिवसांत तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर न करता क्रेडिट लाइन वापराल. ही एक नवीन प्रणाली असून, जी क्रेडिट कार्डसारखी असणार आहे.
केंद्रीय बँकेने सांगितलं आहे की, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) देशातील सर्व बँकांच्या पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनशी जोडले जाईल. तसंच नवीन UPI नियम लागू झाल्यामुळे, आता ग्राहक उधारीवर खरेदी करण्यासाठी आणि नंतर पैसे भरण्यासाठी UPI वापरू शकतील, जसे की डिजिटल क्रेडिट लाइन.
ग्राहकांना मिळणारे फायदे
आता ग्राहकांना वेगळे कार्ड बाळगावे लागणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहात.
या नवीन प्रणालीमुळे तुमच्या वेळेचीही बचत होणार आहे. तसंच क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण अप्रूव्ह झाल्यानंतर लगेच क्रेडिट लाइन उपलब्ध होईल.
पॉइंट-ऑफ-परचेस क्रेडिट एक्सपीरियंस कोणत्याही अडथळ्याशिवाय असेल. यामुळे BNPL क्षेत्रात जलद वाढ होऊ शकते.
UPI सह देशात डिजिटल पेमेंट वेगाने वाढले
UPI 2016 मध्ये लाँच झाल्यामुळे डिजिटल पेमेंटच्या जगात क्रांती झाली. ग्राहकांना UPI ने थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. सिंगापूर मधील पेनाऊ ही असोसिएशन ऑफ बँकॅने विकसित केलेली UPI सारखीच पेमेंट प्रणाली आहे. RBI कडे भारतात RTGS आणि NEFT पेमेंट सिस्टीम कार्यरत आहे. तसंच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) IMPS, RuPay, UPI सारख्या प्रणाली चालवते.