UPS Scheme : 60, 70, 80 हजार बेसिक वेतन असणाऱ्यांना किती मिळणार पेन्शन? UPS योजनेचे गणित काय?
केंद्राने यूनिफाईड पेन्शन योजनेची ( UPS ) घोषणा केली आहे. ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करणारे महाराष्ट्र राज्य पहीले राज्य आहे. कर्मचाऱ्यांना आता UPS अंतर्गत नेमकी किती पेन्शन मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन योजनेची (UPS) घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने देखील ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे. कर्मचाऱ्यांना आता UPS अंतर्गत नेमकी किती पेन्शन मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. येथे आपण काही बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे उदाहरण घेऊन त्यांना नेमके किती निवृत्ती वेतन मिळणार ते पाहुया…जर त्यांना बेसिक वेतन 60, 70 आणि 80 हजार रुपये आहे तर त्यांना पेन्शन किती मिळणार जर ते आता जरी रिटायर्ड झाले तरी त्यांना नवीन योजनेत निवृत्तीचे काय लाभ होतील ते पाहुयात…
यूनिफाइड पेन्शन योजनेची (UPS) घोषणा
केंद्र सरकारने 24 ऑगस्ट, 2024 रोजी केली आहे. ही यूनिफाइड पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल पेन्शनचा लाभ देणारी आहे. या योजनेंतर्गत एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुबियांना फॅमिली पेन्शन मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षे ते कमाल 25 वर्षे नोकरी केली आहे , त्यांना किमान पेन्शन म्हणून महिना 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
रिटायर्ड कर्मचाऱ्यांना किती पेन्शन?
निवृत्ती नंतरची पेन्शन ज्यांनी 25 वर्षे सर्व्हीस केली आहे त्यांना मिळणार आहे.12 महीन्यांच्या सरासरी बेसिक सॅलरीच्या 50 टक्के पेन्शनची रक्कम त्यांना मिळणा्र आहे.
फॅमिली पेन्शन त्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या 60 टक्के दिली जाणार आहे. जर कर्मचाऱ्याने 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सर्व्हीस केली आहे तर त्याला किमान पेन्शन म्हणून दर महिन्याला 10 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.
सरकार आणि कर्मचाऱ्याचे किती योगदान ?
UPS पेन्शन योजनेनूसार सरकार 18.4 टक्के योगदान देणार आहे, तर कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी + डीए मिळून एकूण 10 टक्के योगदान द्यावे लागणार आहे.
60,000 रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्यांना किती पेन्शन?
जर तुमची 12 महीन्यांची सरासरी बेसिक सॅलरी 60 हजार रुपये आहे. त्यांना निवृत्तीनंतर युपीएस योजनेप्रमाणे 30 हजार रुपये (डीआर जोडून ) पेन्शन मिळणार आहे. तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना फॅमिली पेन्शन म्हणून दर महिन्याला 18,000 रुपये (डीआर जोडून ) मिळणार आहे.
60 हजार सॅलरीवर पेन्शन = 60,000 रुपयांच्या रकमेवर 50% रक्कम + डीआर = 30,000 रुपये + डीआर
30 हजार पेंन्शनवर फॅमिली पेन्शन – 30,000 रुपयांच्या 60% टक्के + डीआर = 18000 रुपये + डीआर
70,000 रुपये बेसिक सॅलरीवर पेन्शन किती ?
जर कर्मचाऱ्याचे 12 महीन्यांची सरासरी बेसिक सॅलरी 70 हजार रुपये आहे आणि त्याने किमान 25 वर्षांपर्यंत नोकरी आहे, तर त्याला रिटायर झाल्यानंतर UPS योजनेप्रमाणे अशी काहीसे असे पेन्शन मिळणार आहे.
70 हजार वेतनावर पेन्शन = 70,000 रुपायांच्या 50% रक्कम + डीआर = 35,000 रुपये + डीआर
35 हजार वेतनावर फॅमिली पेन्शन – 35,000 रुपायांच्या 60% रक्कम + डीआर = 21000 रुपये + डीआर
80 हजार बेसिक सॅलरीवर किती मिळणार पेन्शन ?
जर सरकारी कर्मचाऱ्यांचे 12 महिन्याची सरासरी बेसिक सॅलरी 80 हजार रुपये आहे आणि त्याने किमान 25 वर्षांपर्यंत नोकरी केली आहे. तर त्याला यूपीएस अंतर्गत किती पेन्शन मिळणार ?.
80 हजार वेतनावर पेन्शन = 80,000 रुपयांच्या 50% रक्कम + डीआर = 40,000 रुपये + डीआर
40 हजार पेन्शनवर फॅमिली पेन्शन – 40,000 रुपयांची 60% रक्कम + डीआर = 24000 रुपये + डीआर