Twitter : रुसलेल्या डोनाल्ड तात्यांची जोरदार घोषणा.. Twitter च्या खांदेपालटावर काय म्हणाले ट्रम्प..लवकरच करणार ही घोषणा..
Twitter : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कळी सध्या खुलली आहे. ट्विटरमधील खांदेपालटावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
नवी दिल्ली : अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष (President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कोण ओळखत नाही. केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगात त्यांच्या धोरणांमुळे ते परिचीत आहेत. त्यांची पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा अर्थातच मतदारांनी (Voters) काही पूर्ण होऊ दिली नाही. पण एखादा तगडा व्यावसायिक (Businessman), गर्भश्रीमंत राष्ट्राध्यक्ष पद कसे सांभाळतो, याचा अमेरिकेने आणि जगानेही अनुभ घेतला आहे. ट्विटरविषयी त्यांचे मत आता जगासमोर आले आहे.
जगातील गर्भश्रीमंत एलॉन मस्क याने ट्विटरची मालकी मिळवली. त्याने हे पाऊल टाकले नसते तर त्याच्यावर खटला गुदरला असता. पण त्याने त्याअगोदरच डील पूर्ण करण्यासाठी पैसा ओतला. त्याने आल्या आल्या ट्विटरमध्ये बदलाला सुरुवात केली.
मस्कने आल्याबरोबर चार वरिष्ठांना घरचा रस्ता दाखविला तर इतरांची छाटणी काही दिवसात करण्यात येईल. दरम्यान ट्विटर वापरकर्त्याने त्याने काही सुविधा ही सुरु केल्या आहेत. या अधिग्रहणावर आणि घडामोडींवर जगातील दिग्गज प्रतिक्रिया देत आहेत.
अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्याबद्दल मस्क यांचे अभिनंदन केले आहे. ट्विटर आता समजूतदार लोकांच्या हाती गेल्याची पहिली प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली.
पण त्यांची सर्वात मिश्किल प्रतिक्रिया होती, मला नाही वाटत, ट्विटर माझ्याशिवाय यशस्वी राहील.’ त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ट्रम्प पुन्हा ट्विटरवर परत येतील आणि माहोल तयार करतील अशी युझर्सची प्रतिक्रिया आहे.
शुक्रवारी फॉक्स न्यूज डिजिटल वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्यात ट्रम्प यांनी, मस्क आपल्याला आवडत असल्याचे सांगत, त्यांचे अभिनंदन केले आहे. मस्क ट्विटरमध्ये आश्वासक वातावरण आणतील, अशी आशा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
‘मला अत्यंत आनंद झाला आहे की ट्विटर हे आता शहाण्या लोकांच्या हाती आहे. त्यामुळे यापुढे कट्टरपंथी डावे वेडे आणि अमेरिकेचा द्वेष करणारे वेडे ते चालविणार नाहीत.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ट्विटर प्लॅटफॉर्मवर आता वापरकर्त्यांना कंटेंट मॉडरेशन म्हणजेच एडिट बटन देण्याचा पर्याय लागू करण्यावर सहमती झाली आहे. सध्या ही सुविधा अमेरिकेतील 44 टक्के अँड्राईड वापरकर्त्यांना ही सुविधा देण्यात आली आहे.