CRYPTO TRACKER: बिटकॉईनच्या किंमतीत घसरण, क्रिप्टो वॉल्यूम डाउन!
ग्लोबल मार्केट कॅप 1.98 ट्रिलियन डॉलर असून त्यामध्ये गेल्या काही दिवसांत 5.04 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. एकूण क्रिप्टो मार्केट वॉल्यूम गेल्या 24 तासांत 120.40 अरब डॉलर वर असून ज्यामध्ये 9.15 टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्लीः क्रिप्टोकरन्सीच्या (CRYPTOCURRENCY) किंमतीत आज (गुरुवारी) मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविली गेली. ग्लोबल मार्केट कॅप 1.98 ट्रिलियन डॉलर असून त्यामध्ये गेल्या काही दिवसांत 5.04 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. एकूण क्रिप्टो मार्केट वॉल्यूम गेल्या 24 तासांत 120.40 अरब डॉलर वर असून ज्यामध्ये 9.15 टक्के वाढ झाली आहे. डिसेंट्रलाईज्ड फायनेन्सच्या (Dfi) मार्केट वॉल्यूममध्ये 12.64 टक्क्यांची वाढ झाली. स्टेबलकॉईन्सच्या (STABLECOINS) वॉल्यूममध्ये गेल्या 24 तासांत 84.04 टक्के वाढ नोंदविली गेली. बिटकॉईन्सची वर्तमान किंमत 4.37 टक्क्यांच्या घसरणीसह 34.43 लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी मध्ये गेल्या 24 तासात 0.24 टक्के वाढ झाली आहे. सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी डॉगेकॉईन (DOGECOIN) मध्ये सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. गेल्या 24 तासांत 10.45 टक्के घसरण झाली आहे. वर्तमान किंमत 11.3317 रुपयांवर आहे.
‘क्रिप्टो’ अप-डाउन!
इथेरियम मध्ये 4.75 टक्क्यांच्या घसरणीसह 2,51,999.9 रुपयांवर ट्रेड करीत आहे. तर थेदर 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह 77.19 वर पोहोचले आहे. कार्डेनो 7.92 टक्क्यांच्या घसरणीसह 83.7900 वर पोहोचले आहे. बिनान्स कॉईन गेल्या 24 तासांत 4.63 टक्क्याच्या घसरणीसह 33,432.27 वर ट्रेडिंग करत आहे. एक्सआरपी मध्ये 4.8 टक्क्यांच्या घसरणीसह 60.7893 वर पोहोचले आहे.
‘क्रिप्टो’कर कक्षेत:
केंद्रीय अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीला (Cryptocurrency) कर कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या वित्तीय वर्षात क्रिप्टोकरन्सी पासून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे क्रिप्टोवर कर आकारणीच्या कालावधी विषयी असलेल्या शंकांवर यापूर्वीचं केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) स्पष्टीकरण दिलं आहे. एप्रिल 2022पूर्वी करण्यात येणारे क्रिप्टो व्यवहार करमुक्त नसणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2022) अर्थ मंत्र्यांनी डिजिटल संपत्तीतून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर आकारणीची घोषणा केली आहे.
भारतात रुपयाचं वर्चस्व
अर्थ सचिव टीव्ही सोमनाथन यांनी बिटकॉईन (Bitcoin) किंवा इथेरियम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीला भारतात कधीही कायदेशीर वैधता मिळणार नाही. केवळ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे जारी करण्यात आलेला डिजिटल रुपया (Digital Rupee) कायदेशीर वैध असेल. आरबीआय द्वारे जारी करण्यात येईल मात्र त्याचे स्वरुप डिजिटल असेल. तुम्ही डिजिटल वॉलेटचा वापर करुन वस्तू खरेदी करू शकतात. बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी द्वारे निर्मित कोणतीही कलाकृती कायदेशीर वैध असणार नाही.
संबंधित बातम्या