Cough Syrup : चुकूनही मुलांना देऊ नका हे कफ सिरप, WHO ने दिला इशारा

Cough Syrup : लहान मुलांसाठी हे कप सिरफ घातक असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Cough Syrup : चुकूनही मुलांना देऊ नका हे कफ सिरप, WHO ने दिला इशारा
कफ सिरपपासून सावधान
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 6:37 PM

नवी दिल्ली : उझबेकिस्तानने (Uzbekistan) दावा केला आहे की, भारतातील मॅरियन बायोटेक कंपनीच्या कफ सिरप (Cough Syrup) देशातील मुलांसाठी घातक ठरले आहे. खोकल्यावरील या औषधाने उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. या दाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. मॅरियन बायोटेकद्वारा तयार लहान मुलांसाठीच्या कप सिरपचा उपयोग न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कंपनीच्या दोन्ही कप सिरपबाबत नागरिकांना इशारा दिला आहे. त्याचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे औषध कसोट्यांवर उतरलेले नाही आणि त्याचा दर्जा ही अत्यंत खराब आहे. गुणवत्तेच्या आधारावर हे औषध योग्य नसल्याचा निर्वाळा डब्ल्यूएचओने दिला आहे. आता या कंपनीवर भारतात कठोर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरातील सेक्टर 67 मध्ये ही कंपनी आहे. मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना उत्तर प्रदेश सरकारने रद्द केला आहे. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FSDA) ने याची दखल घेत कंपनीचा परवाना रद्द केला.

हे सुद्धा वाचा

उझबेकिस्तानमधील कथित मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीच्या कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे औषध नियंत्रक ए. के.जैन यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO), मेरठ येथील अन्न आणि औषध प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संयुक्त कारवाई करत कंपनीच्या उत्पादनांचे 32 नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तोपर्यंत या कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने जॉनसन अँड जॉनसन कंपनीला मोठा दिलासा दिला. बेबी पाऊडरचे (Baby Powder) उत्पादन आणि भारतभर विक्रीला परवानगी दिली. हायकोर्टाने राज्य सरकारचा आदेश रद्दबातल ठरविला.

कंपनीच्या बेबी पावडरमुळे कँसर होऊ शकतो, असा आरोप होता. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी जॉनसन अँड जॉनसनचा परवाना रद्द केला होता. तर 20 सप्टेंबर रोजी दुसऱ्या एका आदेशात बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्रीस बंदी घातली होती.

महाराष्ट्र सरकारने कंपनीच्या बेबी पाऊडरवरची विक्रीच नाही तर उत्पादनावरही लगाम आवळला होता. त्यानाराजीने कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.