Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Small Cap Company | छोटा पॅकेट बडा धमाका, 2 शेअरमागे 1 शेअरचा बोनस! या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जोरदार परतावा

Small Cap Company | स्मॉल कॅप कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने बाजारात धमाका केला आहे. ही कंपनी 2 शेअर्समागे गुंतवणूकदारांना 1 शेअर बोनस रुपात देणार आहे.

Small Cap Company | छोटा पॅकेट बडा धमाका, 2 शेअरमागे 1 शेअरचा बोनस! या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जोरदार परतावा
छोटा पॅकेट बडा धमाकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:15 PM

Small Cap Company | स्मॉल कॅप कंपनी (Small Cap Company) वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने बाजारात धमाका केला आहे. ही कंपनी 2 शेअर्समागे गुंतवणूकदारांना 1 शेअर बोनस रुपात देणार आहे. शेअर बाजारात जवळपास 6 महिन्यांचा कालावधी गुंतवणूकदारांसाठी अत्यंत वाईट गेला. कोराना काळातही बाजाराने एवढे रंग दाखवले नव्हते. एवढा तोटा गुंतवणूकदारांना या कालावधीत सोसावा लागला. परंतू, आता वाईट काळ सरत असून गुंतवणूकदारांना एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या मिळत आहेत. शेअर बाजार (Share Market) पुन्हा रुळावर येत असताना, कंपन्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा बोनस शेअर्सचे वाटप करत आहेत. स्मॉल कॅप कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने (Veeram securities ltd) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.  कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र भागधारकांना दोन शेअरमागे एक बोनस शेअर (Bonus Share) देण्याचा निर्णय घेतला आहे.  या वर्षी कंपनीने परताव्याच्या बाबतीतही गुंतवणूकदारांना जोरदार नफा दिला आहे.  विशेष बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2011 मध्ये झाली आहे.  अवघ्या 10-12 वर्षे असलेल्या या कंपनीने बाजारात सगळ्यानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

काय घेतला निर्णय

नियामकाला कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार ‘कंपनीच्या संचालक मंडळाने दोन शेअर्सवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस कधीपर्यंत देण्यात येईल याची तारीख कंपनी सर्वसाधारण सभेत जाहीर करेल.” ही कंपनी दागिन्यांशी संबंधित व्यवसाय करते. विशेष बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2011 मध्ये झाली आहे.

या स्टॉकची कामगिरी कशी आहे?

भारतीय शेअर बाजारात या वर्षी काही मल्टीबॅगर शेअर्सने धमाके केले. त्यांच्या कामगिरीने मोठ्या कॅप असलेल्या कंपन्याही अवाक झाल्या आहेत. वीरम सिक्युरिटीज हा स्टॉक ही छोटा पॅकेट बडा धमाका ठरला आहे. वीरम सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. बीएसई(BSE) वरील कंपनीच्या Shareनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 2.41 टक्के परतावा दिला आहे. 6 महिन्यांची कामगिरी तर तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. कंपनीच्या शेअरच्या किमती 44.11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये एकूण 84.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने 6 जानेवारी 2017 रोजी बाजारात पाऊल ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 818.58 टक्क्यांनी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

(सूचना: ही माहिती केवळ गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घ्या.)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.