कार खरेदी करायचीये? कोणती कार घ्यावी गोंधळ उडालाय; मग या टीप्स फॉलो करा

तुम्हाला कार (Four wheeler) खरेदी करायची आहे? मात्र कार कोणत्या कंपनीची खरेदी करावी, किती सिटर खरेदी करावी? नवी खरेदी करावी की जुनी (Old) खरेदी करावी असे प्रश्न जर तुमच्या डोक्यात गोंधळ घालत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कार खरेदी करायचीये? कोणती कार घ्यावी गोंधळ उडालाय; मग या टीप्स फॉलो करा
कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 5:30 AM

नवी दिल्ली : तुम्हाला कार (Four wheeler) खरेदी करायची आहे? मात्र कार कोणत्या कंपनीची खरेदी करावी, किती सिटर खरेदी करावी? नवी खरेदी करावी की जुनी (Old) खरेदी करावी असे प्रश्न जर तुमच्या डोक्यात गोंधळ घालत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी? कंपनीचे सिलेक्शन (Company selection) कसे करावे, नवी कार खरेदी करावी की जुनी, कार खरेदी करताना बजेटचा अंदाज कसा घ्यावा, अशा विविध गोष्टींची माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे कार खरेदी करताना आपली गरज आणि आपले बजेट या दोन गोष्टी पाहूनच कार खरेदीचा निर्णय घ्यावा. जर तुम्ही मोठ्या आणि गर्दी असणाऱ्या शहरात राहत असल्यास शक्यतो स्मॉल कार खरेदी करावी, यामुळे तुम्हाला शहरातून फिरताना किंवा ट्रॅफीमधध्ये अडकल्यास समस्या जाणवणार नाही. मात्र तुम्ही सतत बाहेरगावचा किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करत असला तर अशावेळी स्मॉल कार कुचकामी ठरते. अशावेळी तुम्हाला अधिक मजबूत आणि टिकावू कार खरेदी करणे हिताचे असते. चला तर एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊयात की कारचे सिलेक्शन कसे करावे? कार खरेदी करताना काय काळजी घ्यावी.

तज्ज्ञ काय सांगतात?

पुण्यातील शुभमने कार खरेदीचे नियोजन केले आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करत असल्यानं तो अतिशय उत्साहित देखील आहे. मात्र, कोणती कार खरेदी करावी याचा निर्णय त्याला घेता येत नाहीये. कारण त्याचं बजेट मोठं असल्यानं त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचमुळे शुभम गोंधळात पडलाय. शुभमप्रमाणेच इतर अनेक जणांना कार खरेदी करताना असेच प्रश्न पडतात. अशा प्रत्येकाला आपली गरज आणि बजेट पाहून कार खरेदी करावी असा सल्ला प्रसिद्ध ऑटो एक्सपर्ट टूटू धवन यांनी दिला आहे.

कार खरेदी करताना काय काळजी घ्याल?

कार खरेदी करताना आपली गरज ओळखा आपली गरज आणि बजेट पाहून कार खरेदीचा निर्णय घ्या कार किती जणांसाठी घ्यायची आहे याचा विचार करा एकट्यासाठी 7 सीटर कार घेण्याची गरज नाही कार खरेदी करताना कारचे मायलेज चेक करा कर्ज काढून कार घेत असाल तर लोनचा व्याज दर 10 ते 15 टक्क्यांमध्ये असावा कार लोनचा व्याज दर अधिक असेल तर तुम्हाला अधिक पैसे भरावे लागू शकतात कारची टेस्ट ड्राईव्ह व्यवस्थित घ्या कार विकल्यानंतर तिचा कितपण परतावा मिळू शकतो याचा विचार करा जर तुम्ही जुनी कार विकत घ्यायाचा विचार करत असाल तर ती व्यवस्थित चेक करा जुन्या कारचे सर्व पार्ट व्यवस्थित आहेत का याची एकदा खात्री करा जुनी कार घेताना त्याच कंपनीची सेम कार इतर ठिकाणी कितीला मिळते त्याची आधी चौकशी करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार खरेदी करताना गडबड करू नका

संबंधित बातम्या

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची ‘टीव्ही9 मराठी’च्या

कन्क्लेव्हमध्ये घोषणाMahaInfra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा

शॉपिंग क्रेडिट कार्ड वापरताय ? फायदे अन् तोटे माहिती करून घ्यायला हवं! आधी जाणून घ्या मग खुशाल वापर करा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.