Aadhaar Card : लहान मुलांचे आधार कार्ड तयार करायचेय? ही आहे सोप्पी पद्धत..
Aadhaar Card : लहान मुलांचे आधार कार्ड तयार करायचे आहे? तर ही आहे सोप्पी पद्धत..त्यासाठी फारशा कागदपत्रांची आवश्यकता नाही..
नवी दिल्ली : भारतात आधार कार्ड (Aadhaar Card)अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे. सध्याच्या काळात आधार कार्ड, तुमच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण कागदपत्रे (Document)ठरले आहे. मोठ्या व्यक्तीसाठी आधार कार्ड जेवढे महत्वाचे असते, तेवढेच लहान मुलांसाठीही आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्रे आहे.
अनेक सरकारी योजनांसाठी (Government Scheme) आधार कार्ड महत्वाचे आहे. आधार कार्डशिवाय तुम्हाला या योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. तसेच तुमची लहान मुलं सरकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे.
आता मोठी मुलंच नाही तर अगदी नवजात बालकांचेही आधार कार्ड काढता येते. त्यामुळे आधार कार्डसाठी तुम्हाला मुलांच्या वयाची अट घातलेली नाही. उलट नवजात बालकांना सहज आधार कार्ड मिळते.
जर तुम्ही आतापर्यंत लहान मुलांसाठी आधार कार्ड तयार केले नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. त्यामुळे वेळेवर आधार कार्डची आवश्यकता पडली तर हे आधार कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
लहान मुलांसाठी आधार कार्ड तयार करण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही आहे. लहान मुलांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचे डिस्चार्ज पेपर्सची गरज असते. तसेच आई-वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक आहे.
या कागदपत्रांआधारे तुम्ही मुलांचे आधार कार्ड तयार करु शकतात. 5 वर्षांपर्यंतच्या आधार कार्डला बाल आधार (Baal Aadhaar) म्हटले जाते आणि त्याचा रंग निळा असतो.
आधार केंद्रांशिवाय अंगणवाडी केंद्रातही लहान मुलांचे आधार कार्ड तयार करता येते. पाच वर्षांखालील मुलांचे बायोमॅट्रीक डिटेल्स घेतले जात नाही. पण मुल 5 वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बायोमॅट्रीक तपशील नोंदविला जातो. ज्यावेळीस मुल 15 वर्षांचे होते, त्यावेळी आधार कार्ड अपडेट केल्या जाते.