शेअर बाजारात गुंतवणूक करायचीये?, मग त्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याच

लोकं जास्त नफ्याच्या अपेक्षेनं विचार न करता पैसा गुंतवतात आणि सर्व पैसा बुडतो. एकूणच शेअर्सची निवड करणे कठीण काम आहे. आणि सगळ्याच गुंतवणूकदारांसमोर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की त्यामुळे तुम्हाला शेअर्सची निवड करणं सोपं जाणार आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करायचीये?, मग त्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्याच
शेअर बाजारातील गुंतवणूक
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 5:30 AM

मुंबई : पुण्यात (Pune) राहणारा राजेश एका खासगी कंपनीत नोकरी करतो. हाती आलेल्या पगारातून राजेश काही रक्कम वाचवतो. बऱ्याच वर्षांपासून त्याच्या मनात गुंतवणुकीचा विचार सुरू आहे. कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल याचा तो सतत विचार करत होता. शेअर बाजारात गेल्या दीड वर्षांपासून तेजी आहे. गुंतवणूकदार आयपीओ (IPO) मध्ये पैसा गुंतवणूक (money Investing) करून श्रीमंत होत आहेत. हे पाहून अखेर भीत भीत राजेशने डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडलं. अकाऊंट ओपन करेपर्यंत सर्व ठीक होतं. आता कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याचं मोठं आव्हान राजेशसमोर उभं ठाकलं. बाजारातील विविध शेअर्सने राजेशच्या डोक्याचा भुगा केला.फायनाशियल्स, ट्रॅक रिकॉर्ड, रिझल्ट्स, बॅलेन्स शीट, फंडामेंटल्स आणि टेक्निकल अ‍ॅनालिसीस सारखे शब्द ऐकूण आणि आकडे पाहून डोकं सुन्न पडलं. बाजारात 700 कंपन्या लिस्टेड आहेत. यासर्व कंपन्यांची माहिती कोठे तपासणार असा प्रश्न राजेशला पडला. राजेश सारखाच प्रश्न अनेकांना पडतो.

गडबडीत निर्णय घेऊ नका

मात्र राजेश हुशार असल्यानं त्याने गडबडीत कोणत्याही शेअर्समध्ये पैसा गुंतवला नाही. राजेश गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करतो. मात्र, लोकं जास्त नफ्याच्या अपेक्षेनं विचार न करता पैसा गुंतवतात आणि सर्व पैसा बुडतो. एकूणच शेअर्सची निवड करणे कठीण काम आहे. आणि सगळ्याच गुंतवणूकदारांसमोर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत की त्यामुळे तुम्हाला शेअर्सची निवड करणं सोपं जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात शेअर्सबद्दल.

कंपनीचे आर्थिक आरोग्य तपासा

शेअर खरेदी करत आहात म्हणजे तुम्ही कंपनीत भागीदार होत आहात. म्हणजेच कंपनीचा फायदा झाल्यास तुमचा फायदा होणार आणि नुकसान झाल्यास नुकसान होणार. तुम्ही बाजारात भाजीपाला खरेदी करताना घासाघीस करता तोलून मापून खरेदी करता. मात्र, कंपनीची खातेवही पाहत नाही. कंपनीचे आर्थिक आरोग्य न पाहाता तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता. आहे ना महत्वाची गोष्ट? त्यामुळे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करताना सर्व प्रथम त्या कंपीची खातेवही तपासा.

‘या’ मुलभूत बाबींचा अभ्यास करा

आता तुम्ही विचाराल की गुंतवणुकीच्या वेळी कोणत्या मूलभूत बाबी पाहाव्यात. याचं उत्तर आहे की मूलभूत चष्म्याच्या भिगांतून तुम्ही कंपनीची पडताळणी करा? आता तुम्ही विचाराल हे काय आहे आणि कसे करावे ? मूलूभत बाबी म्हणजे कंपनीचा व्यवसाय काय आहे? नफा किती आहे. कंपनीकडे रोख रक्कम किती आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कंपनीवर किती कर्ज आहे. तसेच कंपनीचा प्रमोटरची देखील माहिती घ्या.

संबंधित बातम्या

मुलांची पॉलिसी असल्यास पालकांना मिळणार आयपीओमध्ये सवलत, जाणून घ्या ‘एलआयसी’च्या आयपीओबाबत महत्त्वाची माहिती

बँकेतील कामे आजच पूर्ण करा, मार्च महिन्यात बँकांना तेरा दिवस सुटी

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.