Moonlighting | ‘मूनलाईटिंग’ आहे तरी काय? IT कंपन्या का झाल्या सिरियस..

Moonlighting | मूनलाईटिंग हा आयटी उद्योगक्षेत्रात परिचित शब्द आहे. पण त्याचा नेमका अर्थ काय? कंपन्यांना त्यापासून काय तोटा होतो. कर्मचाऱ्यांचा काय फायदा होतो, ते पाहुयात..

Moonlighting | 'मूनलाईटिंग' आहे तरी काय? IT कंपन्या का झाल्या सिरियस..
मूनलाईटिंग, हा काय प्रकार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 5:27 PM

Moonlighting | आयटी क्षेत्रात (IT Sector) मूनलाईटिंग (Moonlighting) हा परवलीचा शब्द आहे. वास्तविक हा प्रकार 10 टक्क्यांच्या वर नाही. पण त्यामुळे आयटी कंपन्यांची चिंता वाढली आहे. विप्रोचे (Wipro) संचालक रिशद प्रेमजी यांनी ही या प्रकाराबद्दल आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा एकादा कंपन्यांमध्ये याविषयावरुन वादंग पेटले आहे. रिशद यांनी हा कंपन्यांसोबत धोका असल्याचे म्हटले होते.

मूनलाईटिंग म्हणजे काय रे भाऊ?

एखादा कर्मचारी नियमीत नोकरी सोबतच अन्य एखाद्या कंपनीचे काम करतो. त्याला आयटी क्षेत्रात मूनलाईटिंग असे नाव देण्यात आले आहे. हे कर्मचारी नियमीत काम तर करतातच, पण अन्य कंपन्यांचे प्रोजेक्टही पूर्ण करुन देतात. अर्थात हे सर्व काम बाहेरून करण्यात येते.

कंपनीला अंधारात ठेवतात

हे काम करताना आयटी क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या कंपन्यांना अंधारात ठेवतात. ते इतर कंपनयांचे काम ही जोरकसपणे करतात. पण यासंबंधीची माहिती कंपन्यांना देत नाही, असा आरोप करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

कंपन्यांना कसं कळत नाही

उलट आयटी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ कंपन्यांच्या भूमिकेवरही नाक मुरडतात. अनेक कंपन्या प्रोजेक्ट लवकर पूर्ण होण्यासाठी त्यावर बाहेरून काम करुन घेतात. त्यामुळे या कंपन्यांनाही जशाच तसे उत्तर मिळत असल्याचा एक प्रवाह आहे.

काम फ्रिलान्सिंगचे नाही

हे काम आयटी कंपन्या दुसऱ्या आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दिल्यास मूनलाईटिंग होते. पण हेच काम फ्रिलान्सरकडून दिल्यास हा प्रकार त्यात मोडत नाही. कारण कंपन्यांचे मते नियमीत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांसाठी राबण्याची गरज नाही.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय?

तर काही कर्मचाऱ्यांच्या मते आयटी क्षेत्रातील कंपन्या त्यांना राबवून घेतात. त्यांची पिळवणूक करतात. या कंपन्यांनी नोकरी दिली म्हणजे त्यांचे खासगी आयुष्य खरेदी केलेले नाही. कंपनीच्या वेळेत प्रामाणिक काम करुन त्यानंतर फावल्या वेळेत ते जर इतर कंपन्यांसाठी काम करत असतील तर चुकले कुठे?

कोरोना कारणीभूत

हा प्रकार वाढण्यास कोरोना कारणीभूत असल्याचे मानल्या जाते. कोरोना काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी पगार कपात केली होती. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला. त्यांनी दुसरीकडे काम शोधले. ती त्यांची निकड होती. अनेकांचे हप्ते थकलेले होते. कर्ज मोठ्या प्रमाणावर डोक्यावर होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा मार्ग धरला.

कमी वेतनही कारण

कमी वेतनामुळे ही अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी मूनलाईटिंगचा मार्ग धरला. त्यांना घर खर्च भागवण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे हा प्रकार वाढला. आयटी कंपन्या प्रचंड नफा कमावतात. पण कर्मचाऱ्यांना राबवूनही त्यांना योग्य मेहनताना देत नसल्याचा आरोप करण्यात येतो. इन्फोसिसचे माजी निर्देशक मोहनदास यांनी कमी वेतनामुळे हा प्रकार वाढल्याचे सांगितले.

नियम अनुकूल

पुणे येथील युनियन नेसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सीनेटच्या मते, आयटी क्षेत्रातील कर्मचारी त्याच्या खासगी वेळेत, त्याच्या खासगी संसाधनाआधारे काम करत असेल तर त्यात चूक काहीच नाही. मात्र कार्यालयीन वेळेत कोणी असा प्रकार करत असेल तर ते चुकीचे असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.