Gold Price outlook : पुढील आठवड्यात सोन्याच्या किमतीवर कोणते 5 घटक परिणाम करतील? गुंतवणूकदारांनी काय करावे हे जाणून घ्या
जेव्हा जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची मागणी वाढते. महागाई विरुद्ध बचाव म्हणून सोन्याच्या विक्रीकडे पाहिले जाते. युक्रेन क्रायसिसमध्ये काही नकारात्मक अपडेट आल्यास सोने मजबूत स्थितीत जाईल. हे संकट संपेपर्यंत सोन्याची मागणी कायम राहणार आहे.
नवी दिल्ली : भारत (India) जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात. तर अमेरिकाकडे 8,133.5 टन सोन्याच्या साठा असून हा देश जगात प्रथम क्रमांकावर आहे. भारताकडे 657.7 टन सोन्याचा साठा असून तो जगाच्या पहिल्या 10 देशांत भारताचा नववा क्रमांक लागतो. तसेच आपल्याकडे सोन्याला एक वेगळं महत्त्व आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात धोका कमी असतो. सोनं (gold) जर विकलं तर त्याचे आपल्याला अगदी लगेच पैसे मिळतात. त्यामुळे आपल्या देशात सोनं घेणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) चढ उतार होत आहे. फेडरल रिझर्व्हकडून (US Federal reserves) व्याजदरात वाढ झाल्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे सोन्यावर दबावाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे खालच्या पातळीवरील खरेदीमुळे सोन्यालाही आधार मिळत आहे. सध्या ते एका श्रेणीत व्यापार करत आहे. सोने सध्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. पुढील आठवड्यात सोन्याचा दृष्टीकोन काय असेल आणि कोणत्या पाच महत्त्वाच्या घटकांचा त्याच्या किमतीवर परिणाम होईल, त्याबद्दल जाणून घेऊया.
1. मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात, सुगंधा सचदेव, उपाध्यक्ष, कमोडिटी रिसर्च, रेलिगेअर ब्रोकिंग यांनी सांगितले की, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी पुढील आठवड्यात येणार आहे. चलनवाढीच्या दरावर बरेच काही अवलंबून असते. फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीसाठी किती आणि किती काळ सक्रिय असेल, महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून आहे.
2. याशिवाय डॉलरचे काय होते याकडेही बाजाराचे लक्ष असेल. डॉलर निर्देशांक सध्या 20 वर्षांच्या उच्चांकावर आहे. व्याजदरात वाढ झाल्याने डॉलर मजबूत झाला आहे. डॉलरच्या हालचालीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. डॉलर आणखी मजबूत झाल्यास सोन्याच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसून येईल.
3. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या युद्ध थांबण्याच्या दिशेने कोणताही चर्चेला यश आलेले नाही. अनिश्चिततेची स्थिती कायम असून, त्यामुळे कच्च्या तेलावरही परिणाम दिसून येत आहे. कच्च्या तेलात वेगाने वाढ झाल्याने महागाईला चालना मिळेल आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होईल. याशिवाय, चीन सरकार अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहनाची घोषणा करू शकते, ज्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल.
4. जेव्हा जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची मागणी वाढते. महागाई विरुद्ध बचाव म्हणून सोन्याच्या विक्रीकडे पाहिले जाते. युक्रेन क्रायसिसमध्ये काही नकारात्मक अपडेट आल्यास सोने मजबूत स्थितीत जाईल. हे संकट संपेपर्यंत सोन्याची मागणी कायम राहणार आहे.
5. अॅक्सिस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की जोपर्यंत महागाई कायम आहे आणि युक्रेनचे संकट कायम आहे तोपर्यंत सोन्याच्या किमती तेजीत राहतील. गुंतवणूकदारांना सल्ला आहे की त्यांनी सोन्याच्या किंमती उतरेल्या असताना सोनं खरिदे करावं. सोन्याच्या दरातील उतार ही एक चांगली संधी आहे.