चोरीचे Aadhaar Card वापरून बँक खाते ओपन करता येऊ शकते ? याचा तुम्हाला किती फटका बसू शकतो जाणून घ्या

भारतामध्ये आधार कार्डला (Aadhaar Card) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. मात्र जर तुमचे आधार कार्ड चोरून एखाद्या व्यक्तीने बँक खाते ओपन केले तर नेमके काय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चोरीचे Aadhaar Card वापरून बँक खाते ओपन करता येऊ शकते ? याचा तुम्हाला किती फटका बसू शकतो जाणून घ्या
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:14 PM

भारतामध्ये आधार कार्डला (Aadhaar Card) अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते. एवढेच नाही तर मुलाच्या शाळेत प्रवेशासाठी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायन्स मिळवण्यासाठी, बँकेत खाते ओपन करण्यासाठी सर्वत्र आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहेच सोबतच आधार कार्डचे अनेक उपयोग आहेत. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जमा करावी लागते. तुम्ही कधी हा विचार केलाय का? जर एखाद्या व्यक्तीने तुमचे आधार कार्ड किंवा त्याची झेरॉक्स प्रत चोरली (Fraud) आणि त्या आधार कार्डवर बँकेत खाते (Bank Account) उघडले तर तुम्हाला किती नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने बँकेत खाते उघडणे शक्य आहे का? याच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

अशा परिस्थितीमध्ये UIDAI काय सांगते?

युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटनुसार जर तुमचे आधार कार्ड या पद्धतीने चोरी गेले आणि एखाद्या व्यक्तीने त्या आधार कार्डच्या मदतीने बँक खाते ओपन करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी तुम्हाला दोषी किंवा जबाबदार माणण्यात येणार नाही. आधार कार्ड हे बँकेत खाते ओपन करण्यासाठी लागणारे एक महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. मात्र खाते उघडताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी ही बँक अधिकाऱ्याची असते. त्यामुळे जर अशा चोरीच्या आधार कार्डवर खाते उघडल्यास त्यासाठी तुम्हाला नाही तर बँकेला जबाबदार धरण्यात येते. तुमचे काहीही नुकसान होत नाही.

‘आधार पूर्णपणे सुरक्षीत’

युआयडीएआयच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अशाप्रकारचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. आधार हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असून, ते पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा युआयडीएआयच्या वतीने करण्यात आला आहे. समजा तुम्हाला तुमच्या आधार कार्डबाबत काही धोका जणवलाच तर आधार लॉक, अनलॉक करण्याची सुविधा देखील युआयडीएआयच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला

Hurun Global Rich List 2022 : मुकेश अंबानींचा जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, अदानींच्या संपत्तीत विक्रमी वाढ

20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.