Internet : उद्यापासून मोबाईलमध्ये धुमशान, तुमचा मोबाईल ही झपाटणार का?
Internet : देशात उद्यापासून माहितीचं द्वार सताड उघडं होणार आहे..
नवी दिल्ली : देशात 5G चे युग आवतरणार आहे. उद्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.
5G नेटवर्क हे पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व (5th Generation) करते. हे मोबाईलचे तंत्रज्ञान आहे. यामध्ये 3 फ्रिक्वेंसी बँड आहेत. लो, मीडियम आणि लार्ज से फ्रिक्वेन्सी बँड असतात. 5G नेटवर्कमुळे वापरकर्त्यांना इंटरनेट स्पीड आणि चांगली कॉलिंग सेवा मिळेल.
4G च्या तुलनेत 5G नेटवर्क 20 पट गतीने काम करेल. 5G नेटवर्कमुळे विविध क्षेत्रात जबरदस्त बदलाव दिसून येतील. ही एक प्रकारे नवीन डिजिटल क्रांती आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल घडून येईल.
5G सेवा उद्यापासून देशातील काही भागात सुरु होत आहे. या सेवेसाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एयरटेल (Bharti Airtel) यांनी कंबर कसली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत जिओ तर एअरटेल मार्च 2024 पर्यंत संपूर्ण भारतात 5G नेटवर्क पोहचवणार आहेत. स्पेक्ट्रमच्या लिलावात या दोन कंपन्यांनी सर्वाधिक बोली लावली होती.
5G प्लॅनची किंमत 4G च्या प्लॅन इतकीच असू शकते. ET Telecom च्या एका वृत्तानुसार, 5G प्लॅनची किंमत 4G च्या प्लॅन इतकीच ठेवण्यात येईल. त्यामुळे ग्राहक झटपट 5G ची सेवा स्वीकारेल. डाटा जेवढा खपेल, तेवढा या कंपन्यांचा बिझनेस वाढणार आहे. त्यावरच कंपन्यांचे सध्या लक्ष्य आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा प्लॅन स्वस्त ठेवण्यात येणार आहे.
आशियातील इतर देशाच्या मानाने, भारतात मोबाईल डेटा सर्वात स्वस्त आहे. डाटा प्लॅन महाग झाले असले तरी इतर देशांच्या मानाने या किंमती अजूनही वाढलेल्या नाहीत. देशात स्वस्तात डेटा प्लॅन मिळत आहे.