डिजिटल लोन म्हणजे काय? डिजिटल लोनसाठी अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे (Corona) संकट आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. रोजगार गेल्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे सध्या डिजिटल लोन घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र डिजिटल लोन घेण्याचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक दिसू येतात.

डिजिटल लोन म्हणजे काय? डिजिटल लोनसाठी अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
डिजिटल कर्ज
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:08 AM

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे (Corona) संकट आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. रोजगार गेल्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. यातील अनेकांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केला. मात्र रोजगार गमावल्यामुळे बँकांनी देखील कर्ज देणे टाळले. तसेच बँकांकडून कर्ज घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा हा डिजिटल लोनकडे (Digital loan) वळवला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अगदी काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध होते, तसेच त्यासाठी कागदपत्रांची देखील आवश्यकता नसते. म्हणून कोरोना काळात जे संकटात सापडले त्यातील अनेकांनी डिजिटल पद्धतीने लोन पुरवणाऱ्या विविध संस्थाकडू कर्ज घेतले. डिजिटल पद्धतीने लोन घेण्याची प्रक्रिया काय आहे? अशा पद्धतीने लोन घेण्याचे फायदे, तोटे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

डिजिटल लोनसाठी अप्लाय कसे कराल?

भारतामध्ये सध्या डिजिटल लोन देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. प्ले स्टोअरवर त्यांचे अ‍ॅपदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही यातीलच एखादे अ‍ॅप डाऊनलोड करून, त्यानंतर तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनीकडे अर्ज करू शकता. तुम्ही जर संबंधित कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची पुर्तता न करता तात्काळ कर्ज मिळते. अशा पद्धतीने लोन देणाऱ्या कंपन्याचे नियम देखील जास्त गुंतागुतींचे आणि क्लिष्ट नसतात. तसेच याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला दहा हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे लोन सहज उपलब्ध होते. मात्र तुम्ही जर बँकेत लोनसाठी गेलात तर तुम्हाला शक्यतो लोन म्हणून पन्नास हजारांच्या आतील रक्कम मिळत नाही. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकता.

डिजिटल लोन घेण्याचे फायदे, तोटे

डिजिटल लोनच्या फयद्यांपेक्षा तोटेच अधिक आहेत. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने लोन घेण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करता तेव्हा हे अ‍ॅप सुरू होण्यापूर्वी तुमच्या मोबाईलच्या अ‍ॅक्सेसचा ताबा मागते. तुम्हाला त्यासाठी परवानगी द्यावीच लागते. तुम्ही परवानगी दिल्यानंतर अशा अ‍ॅपच्या माध्यमातून तुमचा सर्व मोबाईल डाटा संबंधित कंपनीकडे जातो. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. ऑनलाईन कर्ज देणाऱ्या संस्थांचे व्याजदर प्रचंड असतात. जवळपास बँकांच्या तुलनेत तुम्हाला इथे दुप्पट व्याजदराने कर्ज मिळते. ठरलेल्या मुदतीमध्ये कर्जाची परतफेड न केल्यास तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो. तसेच पैसे भरण्यासाठी प्रचंड मानसिक छळ होण्याची शक्यता देखील अधिक असते. फायद्याबाबत बोलायचे झाल्यास अशा प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकता. तुम्हाला लगेच कर्ज उपलब्ध होते, तसेच तुम्हाला मोठ्याप्रमाणात कागदपत्रांची आवश्यकता नसते.

संबंधित बातम्या

फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Russia-Ukraine Crisis : बियर उद्योगाचे टेन्शन वाढले

मारुती सुझुकीच्या वाहनांची मागणी वाढली; सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास अधिक उत्पादन शक्य

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.