Gold Loan : काय आहे गोल्ड लोन? कागदपत्रं लागतात तरी काय
Gold Loan : सोन्यावरील कर्ज देण्यासाठी अनेक वित्तीय संस्था समोर आल्या आहेत. अगदी घरी येऊन सुद्धा काही वित्तीय संस्था कर्ज देतात. तंत्रज्ञानामुळे अनेक पर्याय समोर आले आहे. इतर कर्जांपेक्षा गोल्ड लोन अधिक सुरक्षित मानण्यात येते.
नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : आजकाल कर्ज घेणाऱ्यांची संख्या तेजीने वाढत आहे. छोट्या-मोठ्या गरजांसाठी अनेक जण कर्ज घेतात. पूर्वी कर्ज घेणे समाजात योग्य मानत नव्हते. पण आता ही संकल्पना मागे पडली आहे. गरजा पुर्ततेसाठी अनेक जण कर्ज घेतात. पण कर्ज घेतले तर ईएमआय भरण्याची चिंता सतावते. ईएमआय थकला तर मग त्यावर दंडाचा भरणा करावा लागतो. याप्रक्रियेत कधी कधी कर्जदार गुरफुटून जातो. तुम्हाला अशी झंझट नको असेल आणि अधिक व्याजाचा ताप पण नको असेल तर सोन्यावरील कर्ज (Gold Loan) हा सर्वात चांगला पर्याय मानण्यात येतो. यामध्ये ग्राहकांना सोने आणि त्यावरील कर्जाच्या रक्कमेच्या आधारे व्याज मोजावे लागते.
काय आहे गोल्ड लोन
सध्याच्या काळात सोन्यावरील कर्ज हा चांगला पर्याय आहे. मुलांचे शिक्षण असो वा लग्न अथवा उपचारावरील खर्च सर्वांसाठी सोन्यावरील कर्ज (Gold Loan Option) हा चांगला पर्याय समोर आला आहे. हे कर्ज इतर कर्जांपेक्षा अधिक सुरक्षित मानण्यात येते. बँका अथवा वित्तीय संस्था तुमच्याकडील सोने, सोन्याचे तुकडे, दागिने, सोन्याची नाणे तारण ठेवते. त्या मोबदल्यात बँका कर्ज देतात. कर्जाची परतफेड झाल्यावर वित्तीय संस्था सोने परत करतात.
लवकर मिळते कर्ज
इतर कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोन त्वरीत मिळते. गोल्ड लोन देणाऱ्या बँकांमध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच आता अनेक वित्तीय संस्था सोन्यावरील कर्ज देतात. त्यांच्या जाहिरातींनी टीव्ही स्क्रीन, होर्डिंग व्यापलेले असतात. त्यांचा शाखेत गेल्यानंतर अटी आणि शर्ती वाचूनच कर्ज घेणे फायदेशीर ठरु शकते.
काय लागतात कागदपत्रे
गोल्ड लोनसाठी विविध बँकांचा व्याजदर वेगवेगळा आहे. जर तुम्ही गोल्ड लोन घेत असाल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट साईज फोटो यांची गरज आहे.
किफायतशीर पर्याय
स्वस्तात कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. देशातील अनेक बँका जवळपास 15 वर्षांपासून सोन्यावर कर्ज देत आहेत. घरात साठवलेले अथवा पडून असलेले सोने अशावेळी उपयोगी पडते. तुम्हाला वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. यावर व्याजदर कमी आकारण्यात येतो. साधारणपणे गोल्ड लोन सर्वात किफायतशीर पर्याय ठरतो. वैयक्तिक कर्ज आणि सोन्यावरील कर्ज यामधील व्याजदरातील तफावत पाहिली तर तुम्हाला हे स्वस्ताईचे गणित समजून येईल.