फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

आजच्या काळात विम्याचे (Insurance) महत्त्व अधिकच वाढले आहे. विशेष: कोरोनाच्या संकटानंतर आयुर्विमा आणि आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विमा हे एक प्रकारचे तुमच्या जवळ असलेले  सुरक्षा कवच असते. विमा तुमचे आर्थिक संकटापासून संरक्षण करू शकतो. आज आपण फायर इन्शुरन्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 8:14 AM

नवी दिल्ली : आजच्या काळात विम्याचे (Insurance) महत्त्व अधिकच वाढले आहे. विशेष: कोरोनाच्या संकटानंतर आयुर्विमा आणि आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विमा हे एक प्रकारचे तुमच्या जवळ असलेले  सुरक्षा कवच असते. विमा तुमचे आर्थिक संकटापासून संरक्षण करू शकतो. विम्याचे अनेक प्रकार आहेत. आरोग्य विमा, आयुर्विमा, वाहन विमा असे विम्याचे हजारो प्रकार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत फायर इन्शुरन्सबाबत (Fire Insurance). तुम्ही जर तुमच्या दुकानाचा फायर इन्शुरन्स काढला असेल आणि तुमच्या दुकानाला आग लागली तर संबंधित कंपनी (Insurance Company) तुम्हाला नुकसान भरपाई देते. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुमच्या गरजेनुसार तुम्हाला फायर इन्सुरन्सचे कव्हर पुरवतात. आज आपण फायर इन्सुरन्सचे फायदे, तसेच तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये विम्याचा लाभ मिळू शकतो अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

फायर विमा म्हणजे काय?

फायर विमा हा एक प्रकारे प्रॉपर्टी विम्याचाच एक भाग आहे. फायर इन्शुरन्स घरमालकासोबतच भाडेकरू देखील खरेदी करू शकतो. फायर इन्शुरन्समुळे केवळ तुमचे घरच नाही तर तुमच्या व्यवसायाला देखील संरक्षण मिळते. तुम्ही जर तुमच्या घराचा फायर विमा काढलेला असेल तर यामध्ये आगीमुळे तुमच्या घराचे तसेच घरातील सामानाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्हाला मिळते. तुम्ही जर तुमच्या व्यवसायासाठी फायर विमा घेतला असेल तर यात आग लागून तुमचे दुकान अथवा ज्या काही मशनरी जळाल्या असतील त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळते.

फायर इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

आग लागल्यामुळे झालेले नुकसान आग नियंत्रणात आणताना पाण्यामुळे झालेले नुकसान आगीमुळे सामान घराबाहेर काढताना होणारे नुकसान आग नियंत्रित करण्यासाठी आलेल्या मजुरांची रोजंदारी स्फोटामुळे होणारे घराचे, दुकानाचे नुकसान विज पडून झालेले नुकसान

‘या’ प्रकरणात मदत मिळत नाही

भूकंपामुळे आग लागल्यास युद्ध किंवा हल्ल्यात आग लागल्यास आगीच्या घटनेदरम्यान सामान चोरीस गेल्यास

संबंधित बातम्या

Russia-Ukraine Crisis : बियर उद्योगाचे टेन्शन वाढले

मारुती सुझुकीच्या वाहनांची मागणी वाढली; सेमीकंडक्टरची समस्या दूर झाल्यास अधिक उत्पादन शक्य

मुलींना वडिलांच्या संपत्तीत हिस्सा कसा मिळतो? जाणून घ्या संपत्ती वाटपासंदर्भातील या महत्त्वपूर्ण गोष्टी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.