5G Network | 4G वर जे अशक्य ते 5G नेटवर्कवर शक्य! घरापासून उद्योगापर्यंत बदलाची नांदी

5G Network News | 4G वर जे अशक्य ते 5G नेटवर्कवर शक्य होणार आहे. घरापासून ते पार अनेक उद्योगात या बदलाची नांदी दिसून येणार आहे.

5G Network | 4G वर जे अशक्य ते 5G नेटवर्कवर शक्य! घरापासून उद्योगापर्यंत बदलाची नांदी
5G मुळे जीवनाला गती Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 2:41 PM

5G Network News | 4G नेटवर्क आल्यापासून मोबाईल (Mobile Speed) वेग वाढला आहे. तसा त्याचा उपयोग ही वाढला आहे. आता तर 5G चा जमाना येऊ घातला आहे. देशात 5G चं वारं येऊ घातलं आहे. 5G स्पेक्ट्रमच्या (Spectrum) लिलावात (Auction) सरकारला अपेक्षेपेक्षा बक्कळ पैसा मिळाला आहे. जिओसह एअरटेल, व्होडाफोन आयडिया, (JIO, Airtel, Vodafone IDEA) गौतम अदानी यांच्या डेटा नेटवर्क (Data Network) या कंपनीने ही त्यात सहभाग घेतला होता. या लिलावातून कंपन्यांना 5G स्पेक्ट्रमचा परवाना प्राप्त होईल आणि देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. त्याची दोन वर्षांपासून भारतीयांना प्रतिक्षा होती. पण मध्यंतरी ‘कोरोनामय जग सारे’ असं झाल्याने पुढील प्रक्रिया थंडावली होती. तर नवीन सेवेमुळे देशात सर्वच क्षेत्रात क्रांती दिसून येईल. एका रिपोर्टनुसार, 5G सेवेसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. 5जी हे टेलिकॉम क्षेत्राचे नवे युग म्हटले जात आहे. तुम्हाला माहित आहे काय की अशी अनेक कार्ये आहेत जी केवळ 5G नेटवर्कवरच चालू शकतात? ते इतर कोणत्याही त्या खालील नेटवर्कवर सेवा देऊ शकत नाहीत.

डाऊनलोडिंग स्पीड कसा?

सध्याच्या घडीला तुम्ही 4G आणि 3G नेटवर्कवरही फाईल्स, व्हिडिओ, फोटो, पीडीएफ डाऊनलोड करू शकता, पण 5G नेटवर्कचा डाऊनलोडिंग स्पीड खूप जास्त आहे. 5G नेटवर्कवर काही मिनिटांत हेवी गेम्स आणि व्हिडिओ डाऊनलोड करू शकाल. अनेक रिपोर्टनुसार, 5G चा डाऊनलोडिंग स्पीड 4G पेक्षा 100 पट अधिक वेगवान असेल. 4Gचा कमाल वेग 45 एमबीपीएस(Mbps) इतका मानला जातो, तर 5G चा वेग 1000 एमबीपीएस (Mbps)पर्यंत असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ऑनलाइन गेमिंगसाठी गिफ्ट्स

तुम्हाला ऑनलाइन कन्सोल गेमिंगची (online console gaming)आवड असेल तर 5G तुमच्यासाठी गिफ्ट असेल. 5G नेटवर्कवर तुम्ही न अडकता हाय ग्राफिक्स व्हिडिओ गेम खेळू शकणार आहात. 5G नेटवर्कवर जर आपण गेममध्ये कमांड दिली तर ते त्वरित कार्य करेल. त्याचबरोबर 5G नेटवर्कवरील गेमिंगचा दर्जाही उत्तम असेल

हे सुद्धा वाचा

ऑटोमोबाईल क्षेत्रात

टेस्लासारख्या कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत या गाड्यांना अशा नेटवर्कची गरज भासणार आहे, जे डेटा वेगाने पाठवू आणि प्राप्त करू शकेल आणि 5G नेटवर्कवर हे काम सहज करता येईल. घरात प्रवेश करताच आपोआप दिवा लागतो, सेन्सरच्या करामतीमुळे हा उजेड पडतो. ऑटोमॅटिक कार चालवण्यासाठी नेमका हाच वेग लागणार आहे.

स्मार्ट होम (Smart Home)

स्मार्ट होमची स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरेल. पण त्यासाठी 5G इंटरनेटची गरज भासेल. सिनेमांमध्ये स्मार्ट होम्समध्ये स्मार्ट लाइट, स्मार्ट गेट्स आदी गोष्टी तुम्ही पाहिल्या असतीलच, ज्या फक्त 5G नेटवर्कवर शक्य आहेत. येत्या काळात 5G नेटवर्कच्या मदतीने लाइटपासून ट्रॅफिकपर्यंतची कामे रिअल टाइममध्ये पूर्ण होतील, अशा स्मार्ट सिटीजही पाहायला मिळतील. स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे अशी सुविधा असेल की जेव्हा रस्त्यावर कोणीच नसेल तेव्हा पथदिव्यांचा प्रकाश आपोआप कमी होईल.

8K व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये (Streaming)

आतापर्यंत फोर जीवर तुम्ही फक्त 4K व्हिडिओ पाहू शकलात. पण 5G नेटवर्कवर तुम्ही 8K रिझॉल्यूशन असलेले व्हिडिओ पाहू शकाल आणि तेही बफरिंगशिवाय आणि न अडकता. खरं तर, 5G नेटवर्कमधील डेटा ट्रान्सफर खूप वेगवान आहे आणि यामुळे, व्हिडिओ वेगाने लोड होईल. सॅमसंगसारख्या कंपन्यांच्या 8K स्मार्ट टीव्ही बाजारात आणले आहेत. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.