Gold At Home | काय आहे सोन्याचे माप? नाहीतर ईडी आवळेल कारवाईचा फास! इतकेच सोने ठेवता येते घरात, माहिती आहे काय?

Gold At Home | सध्या जिकडे तिकडे ईडीच्या कारवाईची चर्चा आहे. एखाद्याकडे बेहिशोबी मालमत्ता, रोख आणि मोठ्या प्रमाणात दागिने सापडल्यास ही कारवाई होते. तर जाणून घ्या घरात किती सोने ठेवता येते याविषयी

Gold At Home | काय आहे सोन्याचे माप? नाहीतर ईडी आवळेल कारवाईचा फास! इतकेच सोने ठेवता येते घरात, माहिती आहे काय?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 5:04 PM

Gold At Home | देशभरात सध्या सक्तवसुली संचालनालय, म्हणजे ईडीच्या(Enforcement Directorate ED) कारवाईची चर्चा रंगली आहे. प्रत्येक राज्यात ईडीच्या छापेमारीचीच धसका नेत्यांसह सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी घेतला आहे. आयकर खात्यापेक्षा (Income Tax Department) ही ईडीचा धाक वाढला आहे. केव्हा धाड पडेल सांगता येत नाही. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherji) घरावर जी कारवाई झाली. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. सर्वसामान्य नागरीक ही या कारवाईसंबंधींच्या बातम्या मोठ्या चवीने तर वाचतच आहे पण तो सजग ही होत आहे. अनेक जण गुगल सर्चमध्ये ईडीच्या कारवाईची आणि किती मालमत्ता असावी, रोख किती असावी, सोन्याचे दागिणे किती असावे याची माहिती घेत आहे. तेव्हा ही बातमी आपल्यासाठीच. घरात किती सोने (Gold at home) ठेवता येते याविषयीची माहिती आपण करुन घेऊयात.

सुवर्ण नियंत्रण कायदा हद्दपार

देशातील सुवर्ण नियंत्रण कायदा (Gold Control Act) इतिहासजमा झाला आहे. पण घरात तुम्ही किती सोने ठेऊ शकता, याविषयी काही मर्यादा आहेत. घरात जास्त सोने असल्याची कुणकुण लागल्यावर खरंच प्राप्तिकर खात्याची धाड पडू शकते का? जर कायदा अस्तित्वात नाही तर मर्यादा किती आणि कारवाई काय होऊ शकते? असे अनेक प्रश्न उपस्थित होता. केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाने (Central Board of Direct Taxes) याविषयीचे परिपत्रक जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा

किती ठेवता येते रोख?

घरात रोख रक्कम ठेवण्याला मर्यादा नाही. पण ही रक्कम कुठून आली, त्याचे स्त्रोत काय याची माहिती चौकशी जर झाली तर तुम्हाला द्यावी लागेल. यासंबंधीचे सविस्तर उत्तर तुम्हाला तपास यंत्रणेला देता येणे आवश्यक आहे. तसेच याविषयीचे कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. जर तुमच्या उत्पन्नापेक्षा अधिकची रक्कम तुमच्याकडे सापडली तर आवश्यकतेनुसार आणि तुमच्याकडील माहितीनुसार कारवाई करण्यात येते. एखाद्याला दंड ठोठावला जातो. रक्कम जप्त होते आणि न्यायालयीन खटल्यात जो निर्णय होईल, त्यानुसार शिक्षा होते. तसेच काही प्रकरणात रोख जप्त होते. दंड आणि शिक्षा दोन्ही होतात. काही प्रकरणात 50 ते 150 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो.

किती सोनं ठेवता येते?

प्राप्तिकर खात्याने याविषयीचे काही नियम आणि काही मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यानुसार , वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्या व्यक्तीला दागिणे, आभूषणे बाळगता येतात. घरात ठेवता येतात. या नियमानुसार लग्न झालेले आणि लग्न न झालेल्या महिला आणि पुरुषांसाठी नियमात बदल आहे. एका विवाहित महिलेला 500 ग्रॅम सोन्याची आभुषणे, दागिने ठेवता येतील. तर अविवाहित महिलेला 250 ग्रॅम सोन्याची दागिने जवळ बाळगता येतील. परंतू पुरुष याबाबतीत तेवढे लकी नाहीत. पुरुष विवाहित असो वा लग्नाळू, त्याला 100 ग्रॅमपेक्षा जास्तीचे सोने बाळगता येत नाही. जर प्राप्तीकर खात्याची (Income Tax Department) धाड पडली तर याहून जास्त्तीचे सोने जप्त होईल. परंतू, 100 ग्रॅमपर्यंतचे सोने जप्त होणार नाहीत. ही मर्यादा कुटुंबासाठी आहे. यापेक्षा जास्त सोनं जर सापडलं तर प्राप्तिकर अधिकारी ते जप्त करु शकतात. दुसऱ्याचं सोनं तुम्ही तुमच्या घरात ठेवलं आणि त्याचं समाधानकारक उत्तर देता आले नाही अथवा मर्यादेपक्षा ते अधिक आढळल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.