Flipkart आणि Amazon सेलमध्ये खरेदी करा या 10 महत्त्वाच्या आणि उपयोगी वस्तू

बहुप्रतीक्षित Amazon आणि Flipkart चा सेल आजपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्ही घरातल्या 10 वस्तू अपग्रेड करू शकता. जाणून घ्या यादी.

Flipkart आणि Amazon सेलमध्ये खरेदी करा या 10 महत्त्वाच्या आणि उपयोगी वस्तू
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सेल Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 12:42 PM

मुंबई, दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु झाला आहे. Amazon चा ग्रेट इंडिया फेस्टिव्हल आजपासून म्हणजेच 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. हा सेल 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अमेझॉनने या सेलमध्ये आपल्या प्राइम सदस्यांना प्राधान्य दिले आहे. अशा सदस्यांना 22 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासूनच खरेदीचा आनंद घेता येत आहे. त्याचप्रमाणे Flipkart Big Billion Days सेल देखील आजपासून सुरू झाला आहे. हा फ्लिपकार्ट सेल 30 सप्टेंबरपर्यंत खुला असेल. Amazon प्रमाणेच, Flipkart ने देखील आपल्या Plus सदस्यांना खरेदीसाठी एक दिवस आधीच सेल सुरु केला आहे. दरम्यान या सेलमध्ये या महत्त्वाच्या आणि कामाच्या वस्तृ तुम्ही अपग्रेड करू शकता.

  1. फ्रिज- फ्लिपकार्टच्या सेलमध्ये फ्रीज खरेदी केल्यास 53 टक्के सूट दिली जात आहे. म्हणजेच या सेलमध्ये तुम्ही अर्ध्या किमतीत नवीन फ्रीज खरेदी करू शकता. मोठ्या ब्रँडच्या फ्रीजवरही 30 ते 35 टक्के सूट मिळत आहे. याशिवाय  Amazon वर देखील फ्रीज खरेदीवर 50 टक्के सूट मिळत आहे. याशिवाय, दोन्ही प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज ऑफर देखील आहेत.
  2. एसी- बदलत्या ऋतूनुसार एसी ही आता चैनीची वस्तू नसून गरज बनली आहे. तुम्हालाही घरात एसी लावायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये नवीन एसी 60 टक्क्यांपर्यंत सवलतीत उपलब्ध आहे. त्याच वेळी, Amazon AC वर 45 टक्के सूट देत आहे. या सेलमध्ये तुम्ही चांगल्या ब्रँडचा 5-स्टार दीड टन  एसी खरेदी करून 5-7 हजार रुपये सहज वाचवू शकता.
  3. हे सुद्धा वाचा
  4. वॉशिंग मशिन- वॉशिंग मशीनबद्दल बोलायचे झाले तर, या सेलमध्ये तुम्ही 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुमच्या घरी वॉशिंग मशीन आणू शकता. चांगल्या ब्रँडच्या पूर्णपणे स्वयंचलित वॉशिंग मशिन देखील मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. Flipkart सेलमध्ये या डिव्हाइसवर 59 टक्के आणि Amazon वर 45 टक्के सूट देण्यात येत आहे.
  5. शिलाई मशीन- शिलाई मशीनच्या बाबतीतही, दोन्ही सेल ऑफरने भरलेल्या आहेत. Amazon वर शिलाई मशीन खरेदी करून 78 टक्के सूट मिळू शकते. त्याच वेळी, फ्लिपकार्टवर 79 टक्के पर्यंत सूट उपलब्ध आहे.
  6. सोफा- सणासुदीच्या या सेलमध्ये तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत नवीन सोफा खरेदी करू शकता. Flipkart सोफ्यावर 75-80 टक्के सूट देत आहे, तर Amazon वर 80 टक्के सूट मिळत आहे.
  7. वॉटर प्युरिफायर- फ्लिपकार्ट सेल वॉटर प्युरिफायरवर 72 टक्के सूट देत आहे. दुसरीकडे, Amazon वॉटर प्युरिफायरवर 76 टक्के सूट देत आहे.
  8. पंखे आणि गीझर- पंखा ही प्रत्येक ऋतूची गरज असते, तर हिवाळ्यात गिझर आवश्यक झाले आहेत. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने बंपर डिस्काउंटसह तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. हे उपकरण फ्लिपकार्टवर रु.199 पासून उपलब्ध आहेत. Flipkart च्या सेलमध्ये पंखे आणि गीझरवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तर, Amazon च्या सेलमध्ये या उपकरणांवर 70 टक्के सूट आहे.
  9. सायकल- Amazon सायकल खरेदीवर 80 टक्के सूट देत आहे. म्हणजेच 50 हजार रुपयांची सायकल तुम्ही फक्त 10 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, फ्लिपकार्ट सायकल खरेदीवर 37 टक्के सूट देत आहे.
  10. इस्त्री- इस्त्री फ्लिपकार्ट सेलमध्ये 81 टक्क्यांपर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. त्याच वेळी, Amazon च्या सेलमध्ये 74% पर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे.
  11. हिवाळी कपडे- हिवाळा हंगाम एक किंवा दोन महिन्यांत सुरू होईल आणि ऋतू बदलत असताना तुम्हाला नवीन कपड्यांची आवश्यकता असेल. या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये तुम्ही स्वस्त दरात असे कपडे देखील खरेदी करू शकता. Amazon च्या सेलमध्ये हिवाळ्यातील कपड्यांची रेंज फक्त 199 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, फ्लिपकार्ट किमान 50 टक्के सूट देण्याचा दावा करत आहे.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.