कोणालाही चेक जारी करताना राहा सावधान, एका चुकीमुळे होऊ शकतो भूर्दंड
चेक आजही एक पॉवरफूल फायनान्सियल इंस्ट्रूमेंट्स आहे. त्यामुळे सहजरीत्या ऑफलाईन मोडद्वारे पैशांची देवाणघेवाण होऊ शकते. त्यामुळे चेक लिहीताना काय काळजी घ्यावी ते पाहा...
नवी दिल्ली | 6 ऑगस्ट 2023 : सध्या ऑनलाईन व्यवहार होत असले तरीही चेकने देखील व्यवहार कमी झालेले नाहीत. मोठ्या पेमेंटसाठी आजही चेकचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे कोणालाही चेक देताना तो भरताना काळजी घ्यायला हवी. जर आपण चेक लिहीताना योग्य खबरदारी घेतली नाही तर आपला चेक बाऊन्स देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला दंड आणि शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे कोणालाही चेक जारी करताना घाई करु नका. तुम्हाला चेकवर सही करताना अनेक बाबींची काळजी घ्यायला हवी.
चेक बाऊन्स केव्हा होतो
तुम्ही जारी केलेला चेक त्यावेळी बाऊन्स होतो ज्यावेळी तुमच्या खात्यात बॅलन्स नसतो. त्यामुळे चेक साईन करताना सर्वात आधी आपल्या खात्यात आवश्यक पैसे आहेत की नाही याची नीट खातरजमा करावी. कारण चेक बाऊन्स झाला तर तुम्हाला दंड आकारला जातो. चेक बाऊन्स झाला तर केवळ दंडच नाही तर ज्या पार्टीला तुम्ही चेक जारी केला आहे त्यांनी जर खटला दाखल केला तर नेगोशिएबल इंस्ट्रुमेंट एक्ट 1881 नूसार तुम्हाला कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते.
चेक बाऊन्स तेव्हा होतो जेव्हा कोणताही चेक रिजेक्ट होतो आणि पेमेंट होत नाही, तेव्हा चेक बाऊन्स झाला असे म्हटले जाते. अनेकदा खात्यात पैसे नसल्याने चेक बाऊन्स होतो. काहीवेळा सहीमध्ये बदल झाल्यासही चेक बाऊन्स होतो.
तारीख योग्य लिहावी
जेव्हाही चेक जारी करायचा असेल तर तारीख योग्य लिहायला हवी. तारखेबाबत आपल्याला कोणताही गोंधळ नको. तुम्ही चुकीची तारीख लिहीली तरी चेक बाऊन्स होतो. तुम्हाला तुमचा आर्थिक रेकॉर्ड चांगला राखायचा असेल तर चेक बाऊन्स होऊ देऊ नये.
नाव योग्य लिहावे
तुम्हाला चेक ज्याला द्यायचा आहे त्याचे नाव योग्यप्रकारे लिहावे लागेल. ते स्वच्छ अक्षरात लिहावे. चेक कोणतीही खोडाखोड नको. जर कोणतीही चूक झाली तरी चेक बाऊन्स होऊ शकतो.
सहीवर लक्ष द्यावे
तुम्हाला चेकवर सही करताना नेहमी सावधान राहीले पाहीजे. सहीमध्ये थोडाही बदल असेल तर चेक वटू शकत नाही. अनेकदा लोक वेगवेगळ्या सह्या करीत असतात. त्यामुळे चेक बाऊन्स होऊ शकतो. जर कोऱ्या चेकवर सही केली असेल तर तो ब्लॅंक चेक कोणाही देऊ नये तो त्याचा गैरवापर करु शकतो.