Aadhaar Card : काय सांगता, आधार कार्ड पण एक्सपायर होतं? अशी तपासा वैधता
Aadhaar Card : आधार कार्ड पण एक्सपायर होतं का? अनेक जणांनी तर हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. काय आहे याचं उत्तर, आधार कार्ड एक्सपायर झालं असेल तर त्याची वैधता तपासणार कशी, या आहेत सोप्या स्टेप्स
नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) आता प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येतो. आधार कार्ड हाच ओळखीचा पुरावा म्हणून दाखविण्यात येतं. अर्थात इतर ओळखपत्र पण प्रमाणित आहेतच. पण आधार कार्डचा सर्वत्र वापर होतो. बँकेपासून ते शाळेत दाखला घेण्यापर्यंत आधार कार्डचा वापर करण्यात येतो. आता तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड संलग्न करणे पण बंधनकारक करण्यात आले आहे. विना आधारकार्ड अनेक ठिकाणी काम होत नाही. पण आधार कार्ड एक्सपायर होतं का? अनेक जणांनी तर हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. काय आहे याचं उत्तर, आधार कार्ड एक्सपायर झालं असेल तर त्याची वैधता तपासणार ( Validity Check) कशी, या आहेत सोप्या स्टेप्स
आधार कार्ड वैध आहे का? आधार कार्ड सत्यापित केल्यानंतर ते वैध आहे की नाही, हे तपासता येते. चौकशी आणि तपासणी केल्यानंतर तुम्ही त्याची सत्यता तपासू शकता. तसेच या पद्धतीमुळे तुमचे आधार कार्ड खरे आहे की खोटे, ते नकली तर नाही ना, हे पण समोर येईल. तुमचे आधार कार्ड दुसराच कोणी तरी वापरत तर नाही ना, याचा पडताळा करता येईल. ऑनलाईन व्हेरिफिकेशन, सत्यता, पडताळा करुन तुमचे आधार कार्ड किती सुरक्षित आहे, याची खात्री करता येते.
किती दिवस असते व्हॅलिडिटी जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड जारी होते, तेव्हा ते आयुष्यभर वैध राहते. पण लहान मुलांच्या बाबतीत त्याला काही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. आधार कार्ड काही काळासाठी वैध असते. पाच वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड हे निळ्या रंगाचे असते. त्याला बाल आधार कार्ड असे नाव आहे. मुलं पाच वर्षांचे झाल्यावर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच पुढे मुलं जसं मोठे होते, तसे वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.
आधार कार्ड सक्रीय करण्यासाठी काय कराल बाल आधार कार्ड पाच वर्षानंतर अपडेट केले नाही तर ते डिएक्टिव्ह, निष्क्रिय होते. अशावेळी आधार कार्ड सक्रिय करण्यासाठी, पुन्हा सुरु करण्यासाठी बायोमॅट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलाच्या नावे नवीन आधार कार्ड जारी करण्यात येते. तर मुलं 15 वर्षाचे झाल्यानंतर ते अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड सक्रीय राहते. सुरु राहते. यावेळी योग्य माहिती देणे आवश्यक आहे.
असा करा पडताळा
- सर्वात अगोदर आधार कार्डची अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा
- होमपेजवर आधार सर्व्हिस वर क्लिक करा
- आधार कार्ड क्रमांक व्हेरिफाय, पडताळा करण्याचा पर्याय निवडा
- 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड टाका
- आधार कार्डची पडताळणी करा
- व्हेरिफाय कळ दाबून तुमच्या आधार कार्डचा पडताळा करा