Train मध्ये तुमच्या सीटवर दुसऱ्यानेच केला कब्जा? मग आता काय करणार

Indian Railway | अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना आरक्षीत आसनावरुन भांडण होताना आपण पाहिले असेल. अनेकदा काही प्रवासी दांडगाई करतात. ज्यांनी अगोदरच सीट आरक्षीत केले आहे. त्यांना ते बसू देत नाहीत. दूरचा प्रवास उभ्याने करायचा असेल तर मग रेल्वे रिझर्व्हेशनचा अर्थ तरी काय उरतो? नाही का?

Train मध्ये तुमच्या सीटवर दुसऱ्यानेच केला कब्जा? मग आता काय करणार
Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 3:31 PM

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेतून रोज जवळपास 2 कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यातील जास्तीत जास्त प्रवाशी हे स्लीपर अथवा जनरल क्लासमधून प्रवास करतात. एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास 8.50 लाख इतकी आहे. बऱ्याचदा स्लीपर आणि एसी कोचमध्ये विना तिकीट कित्येकदा प्रवाशी थेट प्रवास करतात. त्यावेळी या कोचमध्ये गर्दी होते. या गर्दीमुळे आरक्षण केलेले प्रवासी त्यांच्या सीटपर्यंत पण पोहचू शकत नाहीत. काही पॅसेंजर या आरक्षीत सीटवर कब्जा करतात. ते त्या जागेवरुन हटत नाहीत. अशावेळी भांडण, मारामारी करण्यापेक्षा पण काही प्रभावी उपाय आहेत.

तर दंडाची तरतूद

रेल्वेचे डीजी (पीआयबी) योगेश बावेजा यांच्या माहितीनुसार, जर एखादा प्रवासी त्याची कोच सोडून भलत्याच कोचमध्ये प्रवास करताना आढळला आणि त्याला समाजवून पण त्याने ऐकले नाही तर त्याला दंड सोसावा लागतो. तुमच्या सीटवर दुसरीच कोणती व्यक्ती बसली आणि ती सीट सोडण्यास तयार नसेल तर सर्वात अगोदर TTE ला तुम्ही तक्रार करु शकता. त्याच्याशी वाद घालण्यापूर्वी टीटीईला तक्रार करा.

हे सुद्धा वाचा

अशी करा तक्रार

एसी कोचमध्ये तीन कोचवर एक टीटीई असतो. जर टीटीई दिसला नाही तर तुम्ही ट्रेन सुपरीटेंडेंसकडे तक्रार दाखल करु शकता. टीएसची सीट पेंट्रीकारमध्ये असते. तुम्ही ट्रेनमधील आरपीएफ जवानाकडे पण यासंबंधीची तक्रार करु शकता. तुम्ही टीटी, टीएस अथवा आरपीएफ जवानांकडे तक्रार केल्यावर, तुम्हाला आरक्षीत आसन मिळवून देण्याची त्यांची जबाबदारी असते.

या क्रमांकावर करा तक्रार

तुम्हाला टीटी, टीएस वा आरपीएफ जवान नाही दिसला. अथवा त्यांच्याकडून मदत झाली नाही तर, कंट्रोल रुमच्या 182 क्रमांकावर कॉल करु शकता. त्यावेळी तक्रार करता येईल. याशिवाय तुम्ही रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक 139 वर पण कॉल करु शकता. ही रेल्वेशी संबंधित अनेक प्रकारच्या सेवासंबंधीची एक कॉमन हेल्पलाईन क्रमांक आहे.

रेल मददची पण घ्या मदत

तुम्ही रेल्वेच्या अधिकृत Rail Madad एपवर पण सीट न मिळण्याची तक्रार दाखल करु शकता. याशिवाय तुम्हील रेल्वेच्या एक्स हँडलवर ट्वीट करु शकता. जेव्हा तुम्ही रेल्वेच्या ट्विटर हँडल अथवा कंट्रोल रुममध्ये तक्रार दाखल करता. तेव्हा तिथला कर्मचारी तुमच्या पीएनआर क्रमांकावरुन ट्रेनचे लोकेशन ट्रॅक करतो आणि त्यानंतर रेल्वेतील संबंधित विभागाकडे ही तक्रार पाठविण्यात येते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.