Women Property Rights : घटस्फोटानंतर कसा मिळेल वाटाहिस्सा ? पत्नी केव्हा दाखल करु शकते पतीच्या मालमत्तेवर दावा
Women Property Rights : घटस्फोटानंतर पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार सांगता येतो का? याविषयी कायदा काय सांगतो. कायद्यानुसार काय दावा करता येऊ शकतो. नात्यात कटूता आल्यानंतर अधिकारांविषयी काय भूमिका घेता येते?
नवी दिल्ली : घटस्फोटानंतर (Divorce) पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार सांगता येतो का? याविषयी कायदा काय सांगतो. कायद्यानुसार काय दावा करता येऊ शकतो. नात्यात कटूता आल्यानंतर अधिकारांविषयी काय भूमिका घेता येते? पती-पत्नीतील वैवाहिक आयुष्य संपुष्टात आल्यानंतर पत्नीला पतीच्या संपत्तीवर अधिकार (Women Property Rights) सांगता येतो का? त्यासाठी कायद्याची वाट धरावी लागते की, दोन्ही पक्षांमध्ये समंजस्याने हा प्रश्नावर तोडगा निघू शकतो. दोघेही कमावते असल्यावर पत्नीला पतीच्या संपत्तीवर दावा सांगता येतो का? पती मन मोठे करुन पत्नीला संपत्तीत वाटेकरी करुन घेऊ शकतो का, असे अनेक प्रश्न कायद्याच्या कसोटीवर घासून सुटू शकतात.
जर पत्नीने पतीपासून फारकत घेतली असेल. ती पतीपासून वेगळी राहत असेल. पतीने तिला सोडून दिलं असेल, तर पत्नीला पतीच्या संपत्तीवर दावा दाखल करता येतो. कायद्यानुसार, पत्नीला पतीच्या संपत्तीवर दावा दाखल करता येतो. ती तिचा दावा ठोकू शकते. कायद्याच्या परिभाषेत तिला अर्धा हिस्सा मागता येतो. फारकतीची प्रक्रिया सुरु असेपर्यंत, घटस्फोट होईपर्यंत पत्नीला पतीच्या मालमत्तेत राहता येते. त्याच्या घरात राहता येते. अनेक ठिकाणी एकाच छताखाली विभक्त राहणारी जोडपी आहेत.
जर मालमत्ता पतीच्या नावे असेल. पतीच्या नावावर संपत्ती असेल तर मग पत्नीचे काम अगदी सोप्पे होते. तिला पतीच्या मालमत्तेवर दावा दाखल करता येतो. कायद्यानुसार, ती पहिली वारसदार ठरते. पतीनंतर या संपत्तीवर तिचा पहिला अधिकार असतो. घटस्फोटावेळी ती केवळ पोटगी, मेंटनेंस मागू शकते. घटस्फोट काळात ती पतीकडून खर्चाची तरतूद करुन घेऊ शकते. पतीकडून खावटी मागण्याचा कायद्याने तिला अधिकार असतो. उदरनिर्वाहाचे इतर कोणतेच साधन नसल्याने तिला हा दावा दाखल करता येतो.
आता यातही अनेक कायदेशीर बारकावे आहेत. ते समजून घेऊयात. मालमत्ता पतीच्या नावावर आहे. पण त्यासाठी पत्नीने पैसे दिले असतील. पत्नीने रसद पुरवली असेल. पत्नीने मालमत्ता खरेदीसाठी मोठा वाटा उचलला असेल तर? मग याठिकाणी अशा प्रकरणात मोठा ट्विस्ट येतो. पत्नीला जर हे सिद्ध करता आले की, तिच्या पैशावर मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे, तर ती त्या जागेची मालक ही होऊ शकते. पण तसा सिद्ध पुरावा असावा लागतो.
आता नेमकं यापूर्वीच्या दाव्याच्या उलटी प्रक्रिया असेल तर? म्हणजे पत्नीच्या नावे मालमत्ता आहे आणि पतीने ही मालमत्ता, घर, संपत्ती खरेदी करण्यासाठी खस्ता खाल्या असतील. त्याने पैसा दिला असेल. त्याने कर्ज काढले असेल. कर्जाचे हप्ते पतीने फेडले असतील तर कायद्याच्या कसोटीवर पत्नी आणि पतीचा दावा काय सांगतो. अशा परिस्थितीत पत्नीला पोटगीचा अधिकार मिळतो. पण जर पती तिला सोडत असेल, तसा त्याने दावा केला असेल तर कायदेशीररित्या पहिला वारसदार म्हणून पत्नीला पतीच्या संपत्तीत दावा दाखल करता येतो.
जर पत्नीने लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर स्वतःच्या हिंमतीवर संपत्ती खरेदी केली असेल तर? तिच्या नावे ती मालमत्ता, संपत्ती असेल तर घटस्फोटाचा अशा प्रकरणात काय परिणाम होतो. पत्नीच्या मालमत्तेवर पतीला दावा सांगता येतो का? अशा प्रकरणात पत्नी तिचा निर्णय घेण्यास सक्षम आहे. तिला तिचे स्वातंत्र्य मिळते. ती संपत्ती विक्री करु शकते. बक्षीस म्हणून देऊ शकते. अथवा तिच्याजवळ ठेऊ शकते. हा सर्वस्वी तिचा अधिकार ठरतो.