Investment : टाळाल या चुका, तर मिळेल जोरदार परतावा

Investment : या चुका टाळल्या तर तुम्हाला गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळेल. या 5 चुका टाळल्या तर चांगला परतावा मिळेल.

Investment : टाळाल या चुका, तर मिळेल जोरदार परतावा
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 7:03 PM

नवी दिल्ली : गुंतवणूक (Investment) करताना जागरुकपणा गरजेचा असतो. अनेकदा आपण डोळे झाकून गुंतवणूक करतो आणि हाती काही लागत नाही. अनेक ठिकाणी आपण प्रयत्न करतो, पण योग्य प्रयत्न न केल्याने आपल्या गाठीचा पैसा कधीच वाढत नाही. त्यात कायम फटका बसतो. पैसा डबल तर सोडा, आहे तो वाढत नाही. त्यामुळे आपण वैतागतो. यामागे योग्य नियोजनाचा अभाव हेच एकमेव कारण नसते. तुम्हाला चांगला परतावा (Big Return) मिळवायचा असेल तर गुंतवणूक करताना या 5 चुका टाळणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला फायदा होईल. गुंतवलेल्या पैशांचे चीज होईल.

विमा आणि बचत एकदाच पहिली चूक म्हणजे विमा आणि गुंतवणूक एकच असल्याचा गैरसमज करुन घेणे. विमा आणि परतावा एकाचवेळी देणाऱ्या योजना तुम्हाला अधिक परतावा देऊ शकत नाही. या योजनांमध्ये इतर पर्यायांपेक्षा अधिक रिटर्न मिळत नाही. कारण एक मोठी रक्कम विमा सुरक्षेसाठी खर्च होते, तुम्हाला गुंतवणुकीतून परतावा देणार असल्याने विम्याच संरक्षण रक्कम पण कमी होते. त्यामुळे विमा आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षात ठेवा.

युलिप पासून रहा दूर युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनपासून शक्यतोवर दूर रहा. या योजनांमध्ये विमा आणि गुंतवणूक एकदाच करता येतो. त्यामुळेच युलिप योजनांवर अधिक खर्च करावा लागतो. युलिपमध्ये लॉक इन पीरियड असतो. त्यापेक्षा एक निश्चित रक्कम म्युच्युअल फंडात आणि एक टर्म विम्यात रक्कम गुंतवा, तुम्हाला अधिक फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

सेक्टर आणि थीम आधारीत गुंतवणूक सेक्टर आणि थीम आधारीत कोणत्याही बेस्ट सेक्टरमध्ये पैसा गुंतवणे फायदेशीर ठरेल. वास्ताविक या फंडात अधिक जोखीम असली तरी अधिक परताव्याची संधी मिळते. या योजनांमध्ये गुंतवणूक करताना वेळेचे गणित मात्र साधावे लागते. पण या योजनांमध्ये सर्वच पैसा गुंतवणे फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे पोर्टफोलिओची विविधता हरवते.

असेट अलोकेशन योग्य ठेवा पोर्टफोलिओत असेट अलोकेशन व्यवस्थित ठेवल्यास चांगला परतावा मिळेल. तुम्ही संपूर्ण रक्कम शेअर बाजारात, म्युच्युअल फंड अथवा एफडीत गुंतवाल तर चांगला परतावा मिळणार नाही. त्यासाठी सर्वच पर्यांयामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोखीम स्वीकारुन गुंतवणूक करणे पण फायदेशीर ठरेल. इक्विटी आणि डेट फंडात, शेअरमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल.

माहिती नसेल, तर गुंतवणूक करु नका ज्या योजनांची पूर्ण माहिती नाही, अशा योजनांमध्ये रक्कम गुंतवू नका. दामदुप्पट योजनेत, मल्टि मार्केटिंग स्कीममध्ये, ऐकीव माहिती आधारे, चेन मार्केटिंग योजनांमध्ये बिलकूल गुंतवणूक करु नका. आमिष दाखविणाऱ्यांपासून चार हात दूर रहा. त्यातून फायदा सोडा, नुकसानच जास्त होईल.

जोखीम आणि परताव्याचं गणित समजून घ्या गुंतवणूकदार अनेकदा रिस्क आणि रिटर्न याचं गणित न समजून घेता, गुंतवणुकीवर भर देतात. नंतर हाती काही लागत नाही म्हणून निराश होतात. जिथं जोखीम कमी, तिथं रिटर्न कमी मिळतो. जास्त परतावा हवा असेल तर जोखीम स्वीकारावीच लागेल. तसेच तुमचा पैसा अनेक पर्यायांमध्ये गुंतवावा लागेल. काही ठिकाणी रिस्क तर काही ठिकाणी विना जोखीम गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.