Cibil Score : केव्हा होतो तुमचा सिबिल स्कोअर झिरो, तरीही कर्जासाठी तुम्ही ठरता का हिरो, एक क्लिकवर मिळवा माहिती पटापट..
Cibil Score : Zero सिबिल स्कोअरवर कर्जासाठी दावा ठोकता येतो का..
नवी दिल्ली : जेव्हा ही तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा सर्वात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यात येतो. एखाद्या ग्राहकाचा सिबिल स्कोअरमध्ये (Cibil Score) त्याची क्रेडिट हिस्ट्री (Credit History) महत्वाची ठरते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कर्ज द्यावे की नाही, याचा निर्णय बँक घेते. क्रेडिट स्कोअर (Credit Score) 300 ते 900 दरम्यान निश्चित असणे आवश्यक आहे. 700 वा त्यावरील सिबिल स्कोअर चांगला मानण्यात येतो.
सिबिल स्कोअर जेवढा चांगला, तेवढे कर्ज मिळणे सोपे होते. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमचा सिबिल स्कोअर कधी कधी झिरो (Zero) ही होतो? पण हा प्रकार केव्हा होतो. त्यावेळी तुम्हाला कर्ज मिळते का? तर याविषयीची माहिती आपण पाहुयात..
जर तुम्ही कधीच कोणतेही कर्ज घेतले नाही, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नसाल, तर तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होत नाही. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर शून्य होतो. अशावेळी तुम्हाला नव्याने कर्ज मिळते का? हा प्रश्न अनेकांना सतावतो. अशा ग्राहकांना ही माहिती फायदेशीर ठरते.
सिबिल स्कोअर झिरो असला तरी, बँका त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन, त्याची शैक्षणिक गुणवत्ता याची माहिती घेते. त्याची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या स्टेटमेंटची चाचपणी करण्यात येते. त्यामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहाराची हिस्ट्री मिळते. त्याआधारे कर्जाची प्रक्रिया पूर्ण होते.
30% सिबिल स्कोअर हा तुम्ही नियमीत कर्ज चुकविता की नाही, यावर ठरतो. 25% सिबिल हे तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आहे. सुरक्षित की असुरक्षित यावर ठरते. 25% क्रेडिट एक्सपोजर आणि 20% कर्ज हे वापरावर ठरते.
क्रेडिट स्कोअर 300 ते 900 या दरम्यान असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 वा त्यापेक्षा अधिक असेल तर तो चांगला मानण्यात येतो. 550 ते 750 या दरम्यानचा क्रेडिट स्कोअर हा मध्यम तर 300 ते 550 दरम्यानचा स्कोअर हा अत्यंत वाईट समजण्यात येतो.
क्रेडिट ब्युरो तुमचा क्रेडिट स्कोअर जारी करतात. यामध्ये ट्रांसयुनियन सिबिल, इक्विफेक्स, एक्सपेरियन आणि सीआरआयएफ हायमार्क यासारख्या क्रेडिटची माहिती देणाऱ्या कंपन्या प्रमुख आहेत. या कंपन्या तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि इतर माहिती जमा करतात.
या कंपन्यांकडे ग्राहकांची आर्थिक माहिती गोळा करणे, त्याची माहिती ठेवणे, त्याआधारे क्रेडिट स्कोअर रिपोर्ट तयार करण्यासाठीचा परवाना आहे. 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीआधारे क्रेडिट स्कोअर तयार करण्यात येतो.