खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर बँकेतील पैशांवर कोणाचा हक्क? जाणून घ्या नियम काय सांगतो
बँकेत तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अपघाती किंवा काही कारणास्तव मृत्यू झाला तर बँकेतील पैशांवर कोणाचा हक्क असतो? जाणून घ्या
मुंबई : प्रत्येक व्यक्तीचं बँकेत खातं असावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जनधन योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती बँकेत खातं खोलू शकतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत देशातील बहुतांश लोकांची बँकेत खाती आहेत. यामुळे आर्थिक देवाणघेवाण करणं अधिक सोपं झालं आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत झाली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का बँक खातं असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या खात्याचं काय होत असेल. त्या खात्यात जमा असलेल्या पैशांवर कोणचा हक्क असतोय चला जाणून घेऊयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम काय सांगतो?
नॉमिनीला मिळतो फायदा
जेव्हा तुम्ही बँकेत खातं खोलता तेव्हा नॉमिनीचं नाव देणं आवश्यक असतं. तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी कोणालाही वारस ठेवू शकता. बँक खातेदाराचा अपघाती किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यास त्या खात्यातील पैसे नॉमिनीला दिले जातात. यासाठीच बँका खातं ओपन करताना नॉमिनीचं नाव लिहिण्यास सांगतात. तुम्ही तुमचे आई-वडील, बायको, मुलं यांना नॉमिनी ठेवू शकता.
नॉमिनी नसेल तर बँक काय करते
जर तुम्ही बँक खातं ओपन करताना कोणालाही नॉमिनी ठेवलं नाही. तर खातेधारकाच्या पालकांना बँक खात्यातील रक्कम दिली जाते. पण यासाठी आई वडिलांना स्वत: खातेदाराने कायदेशीर पालक असल्याचं सिद्ध करणं गरजेचं आहे.
ज्वाइंट बँक खातं असेल तर…
जर तुम्ही बँकेत ज्वाइंट खातं ओपन केलं असेल आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या खातेधारकाला बँकेतील पैसे घेण्याचा अधिकार आहे. दुसरा खातेधारक बँक खात्यातून पैसे काढू अगर भरू शकतो.