Education Inflation : वाढत्या शैक्षणिक खर्चाला द्या फुटाची गोळी! महागाईवर अशी झटपट करा मात

Education Inflation : मुलांच्या वाढत्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता आतापासूनच सतावत आहे का? पण असे नियोजन केल्यास तुम्हाला भविष्यातील खर्चाची तरतूद करता येईल.महागाईवर अशी मात करता येईल.

Education Inflation : वाढत्या शैक्षणिक खर्चाला द्या फुटाची गोळी! महागाईवर अशी झटपट करा मात
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 6:00 PM

नवी दिल्ली : प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांना जगातील सर्वच चांगलं देण्यासाठी आटापिटा करतात. चांगले राहिणामान, खाणंपिणे, कपडे, उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण (Education) देण्यासाठी प्रत्येक पालकांचा अट्टहास सुरु असतो. मुलांच्या भविष्याबाबत कोणालाच तडजोड मान्य नाही. जागतिक स्पर्धेत आपल्या मुलाने मागे राहू नये, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असतो. पण वाढत्या महागाईने (Inflation) या स्वप्नांना सुरुंग लागतो. पण जर तुम्ही नियोजन केल्यास वाढत्या महागाईवर तुम्हाला मात करता येईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करता येईल.

शैक्षणिक महागाई किती केंद्र सरकारच्या आकड्यांनुसार, मार्च 2021 मध्ये शैक्षणिक महागाई 2.50 टक्के होती. मार्च 2022 मध्ये हा महागाई दर 3.56 टक्के आणि यंदा मार्च 2023 मध्ये 5.42 टक्के शैक्षणिक महागाई दर होता. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील 8 ते 10 वर्षांत महागाई 10 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांच्या डोक्यावर आता शिक्षणासाठी किती कर्जाचा बोजा वाढणार याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे शिक्षणाच्या बाजारात मुलांच्या भवितव्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.

खासगी संस्थांकडे ओढा सरकारी विद्यापीठं, शाळा यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. काही शाळा, विद्यापीठं वगळता शिक्षणाची काय अवस्था आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. काही सरकारी शाळांनी मोठी मजल मारली आहे. पण सध्या पालकांच्या डोक्यावर खासगी शाळा, विद्यापीठाचं भूत शिरलं आहे. याठिकाणचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असला तरी मुलांना चांगल्या शाळेत शिकविण्यासाठी पालक धडपड करतात.

हे सुद्धा वाचा

तर असा वाढेल खर्च सध्या भारतात व्यवस्थापन शिक्षण म्हणजेच MBA चा खर्च 3 ते 30 लाख रुपये आहे. अनेक खासगी विद्यापीठातून एमबीए करायचं म्हटलं तरी दोन वर्षांचे शुल्क जवळपास 15 लाख रुपये आहे. तुमची मुलं जर आता तीन ते पाच वर्षांची असतील तर ती 21 वर्षांची असताना MBA चा खर्च 10 टक्के महागाई दराने जवळपास 80 ते 85 लाख रुपये असेल. परदेशात सध्या एमबीएसाठी 40 ते 50 लाख रुपये खर्च येतो. 18 वर्षांनी परदेशातील याच शिक्षणासाठी दोन कोटी रुपये खर्च सहज येईल. अभियांत्रिकीसाठी सध्या 4 ते 20 लाख रुपये खर्च येतो. 18 वर्षांनी हाच खर्च 17 ते 85 लाख रुपये होईल.

पर्याय काय तर महागाईवर मात करता करण्यासाठी गुंतवणूक कुठे आणि कशी करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरु कराल, तेवढे तुम्ही फायद्यात रहाल. भविष्यात तुम्हाला शैक्षणिक कर्ज काढण्याची गरज ही पडणार नाही. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे तुमच्या पथ्यावर पडेल. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) मदतीने दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवल्यास तुम्हाला फायदा होईल. त्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला भविष्यातील खर्चावर मात करता येईल.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...