क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी चेक का करावा? जाणून घ्या क्रेडिट रिपोर्ट चेक करण्याचे फायदे

सध्या तुमच्यावर कोणतंही कर्ज नाही, परंतु भविष्यात कर्ज घेण्याचं नियोजन आहे. तसेच क्रेडिट कार्डचा वापर असल्यास क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. आपल्या क्रेडिट रिपोर्टचा स्कोअर दर सहा महिन्यांनी तपासला पाहिजे. क्रेडिट रिपोर्ट बनवणाऱ्या एजन्सी या वर्षातून एकदा विनाशुल्क क्रेडिट कार्डचा रिपोर्ट देतात.

क्रेडिट रिपोर्ट वेळोवेळी चेक का करावा? जाणून घ्या क्रेडिट रिपोर्ट चेक करण्याचे फायदे
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:30 AM

नितीननं ऑफिसमध्ये असताना सहज क्रेडिट रिपोर्ट (Credit report) चेक केला. क्रेडिट रिपोर्ट पाहून त्याच्या नावावर कर्ज दिसत असल्यानं त्याला धक्काच बसला. नितीननं अद्याप कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. तरीही तो कर्जदार झाला होता. त्याच्या पॅनकार्डचा (PAN card) दुरूपयोग करून कुणीतरी गैरव्यवहार केलाय. नितीन सोबत जे झालं तसं कुणासोबतही होऊ शकतं. अशा घटनापासून वाचण्यासाठी वेळोवेळी आपल्या क्रेडिट रिपोर्टचा तपशील तपासा. सध्या तुमच्यावर कोणतंही कर्ज नाही, परंतु भविष्यात कर्ज घेण्याचं नियोजन आहे. तसेच क्रेडिट कार्डचा वापर असल्यास क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. आपल्या क्रेडिट रिपोर्टचा स्कोअर दर सहा महिन्यांनी तपासला पाहिजे. क्रेडिट रिपोर्ट बनवणाऱ्या एजन्सी या वर्षातून एकदा विनाशुल्क क्रेडिट कार्डचा रिपोर्ट देतात. TRASNUNIOIN CIBIL, EQUIFAX, EXPERIAN आणि CRIF HIGHMARK या एजन्सी क्रेडिट रिपोर्टचा तपशील मोफत देतात. रिपोर्टमध्ये काही गैरव्यवहार दिसत असल्यास त्यासंदर्भात लेखी तक्रार करा, असं Rectifycredit.com च्या फाउंडर-डायरेक्टर अपर्णा रामचंद्र (Aparna Ramchandra) सांगतात.

क्रेडिट रिपोर्ट कोणाकडून घ्यावा ?

क्रेडिट रिपोर्टचा स्कोर वैध एजन्सीकडूनच डाऊनलोड करा. बँका आणि काही अॅप तुमची वैयक्तिक माहिती मागतात. तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यानं क्रेडिट एजन्सीकडूनच क्रेडिट रिपोर्ट घ्या. बँका तुमच्यावर असलेलं कर्ज आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती सीबीलला पाठवतात. क्रेडिट स्कोअरमधून आर्थिक देवणघेवणीचा लेखाजोखा दिसतो. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होण्यामागे अनेक कारणं असतात. कर्जाची परतफेड, शिल्लक रक्कम, दीर्घकालीन कर्जाची परतफेड, क्रेडिट कार्डच्या बिलाची परतफेड तसेच कर्जासाठी केलेल्या चौकशीवर क्रेडिट स्कोअर निश्चित होतो. 650 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असल्यानंतर कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळू शकतं. क्रेडिट स्कोअर 750 ते 900 च्या दरम्यान असल्यास कमी व्याजदरात तात्काळ कर्ज मिळतं.

घोटाळ्याची तक्रार कुठे कराल?

ज्या एजन्सीमधून तुम्ही क्रेडिट रिपोर्ट काढला आहे, त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. याशिवाय बँकेतील माहिती अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार करू शकता. बँकेकडून क्रेडिट एजन्सीला माहिती देण्यास चूक झाली असल्यास दुरुस्त करण्यात येते. तक्रार केल्यानंतर 30 दिवसांच्या आत बँक आणि क्रेडिट एजन्सीनं उत्तर न दिल्यास रिझर्व्ह बँकेतील लोकपालकडे तक्रार करा. लक्षात ठेवा 750 क्रेडिट स्कोअर असल्यास क्रेडिट स्कोअर चांगला आहे. या क्रेडिट स्कोअरवर कर्ज तात्काळ मंजूर होते. पण क्रेडिट स्कोअर 600 पेक्षा खाली असल्यास कर्ज मंजूर होताना अनेक अडचणी येतात. म्हणूनच क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासने आवश्यक असते. क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासा. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास तुम्हाला वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज कमी व्याजात मिळू शकतं. याशिवाय बँका क्रेडिट कार्डवर कर्ज देतात तसेच त्यावर खर्च करण्याची मर्यादाही वाढवतात.

संबंधित बातम्या

Gold Silver Price : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी तेजी; चांदीचे भाव तीन हजारांनी वाढले

वरळीतील अलिशान अपार्टमेंटची 144 कोटींना विक्री; आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी केली खरेदी

GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.