ATM Card : कोणतं एटीएम कार्ड भारी! Platinum की Titanium

ATM Card : एटीएम कार्डचं मार्केट फार मोठं आहे. कोणतं एटीएम कार्ड भारी आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडतो. Platinum की Titanium यापैकी कोणतं कार्ड जोरदार आहे, चला तर फायदे जाणून घेऊयात...

ATM Card : कोणतं एटीएम कार्ड भारी! Platinum की Titanium
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 11:18 AM

नवी दिल्ली : जगभरात डिजिटल पेमेंटचे प्रचलन वाढत आहे. विविध डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्डची (Credit Card) बाजारात रेलचेल आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार, नाहीतर बँक खाते उघडताना देईल ते कार्ड बाजारात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतात. बँकेत खाते उघडल्याबरोबर ग्राहकांना डेबिट कार्ड देण्यात येते. डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये अनेक प्रकार आहे, तुमच्या गरजेनुसार, ते निवडू शकता. क्रेडिट वा डेबिट कार्ड घेताना कोणता पर्याय निवडायचा हे ग्राहकाला निश्चित करता येते. त्यानुसार, तुम्हाला फायदा मिळतो. स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते.

Visa Card चे वेगवेगळे प्रकार जगात सर्वात जास्त पेमेंट नेटवर्क व्हिसा आहे. बँकेसोबत व्हिसा भागीदारीत अनेक कार्ड जारी करते.

  1. क्लासिक कार्ड- हे एक बेसिक कार्ड आहे. या कार्डवर जगभरात जवळपास सर्वच सुविधा मिळतात. हे कार्ड कोणत्याही वेळी बदलता येते. तसेच हे कार्ड अपग्रेड करता येते.
  2. गोल्ड कार्ड- जर तुमच्याकडे गोल्ड व्हिसा कार्ड (Gold Visa Card) असेल तर पर्यटन आणि सफारीचा आनंद लुटता येतो. हे कार्ड जगभरात वापरता येते. हे कार्ड ग्लोबल नेटवर्कशी जोडण्यात येते. या कार्डचा रिटेल, डायनिंगक आणि इंटरटेनमेंट आऊटलेट वर स्वाईप केल्यावर अनेक सवलती मिळतात.
  3. हे सुद्धा वाचा
  4. प्लॅटिनम कार्ड- या कार्डवर ग्राहकांना कॅशबँकचा फायदा मिळतो. हे कार्ड पण ग्लोबल एटीएम नेटवर्क सुविधा देते. याशिवाय मेडिकल आणि लिगल रेफरल फायदा मिळतो. या कार्डच्या वापरामुळे अनेक करार, सवलती, ऑफर आणि इतर सुविधा मिळतात.
  5. टायटेनिम कार्ड- टायटेनियम कार्डमध्ये क्रेडिट लिमिट प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत अधिक असते. सर्वसाधारणपणे क्रेडिट हिस्ट्री आणि चांगली कमाई असणाऱ्या लोकांना हे कार्ड सहज मिळते.
  6. सिग्नेचर कार्ड- सिग्नेचर कार्डमध्ये एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस यासह अनेक सुविधा कार्डधारकांना मिळतात. या कार्डमध्ये अधिक सुविधा असतात. त्याचा जगात अनेक ठिकाणी वापर करता येतो.

मास्टरकार्ड पेमेंट नेटवर्क मास्टरकार्डचे (MasterCard) तीन प्रकारचे डेबिट कार्ड एकदम लोकप्रिय आहे. हे तीन डेबिट कार्ड आहेत. Standard Debit Card, Enhanced Debit Card आणि World Debit MasterCard. तुम्ही बँकेत खाते उघडल्यानंतर बँकेकडून तुम्हाला स्टँडर्ड डेबिट कार्ड देण्यात येते.

तीन प्रकारचे RuPay Card स्वदेशी पेमेंट नेटवर्क रुपे कार्ड (RuPay Card) पण ग्राहकांना 3 प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड देते. यामध्ये Classic, Platinum आणि Select Card चा समावेश आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.