Health Insurance म्हणजे ना-ना चा पाढा, कंपन्या का नाकारतात विम्याचा दावा

Health Insurance | कोरोनानंतर आरोग्य विमा खरेदी वाढली आहे. आरोग्य विमा खरेदीचा आलेख उंचावला आहे. पण अनेकदा कंपन्या आरोग्य विम्याचा क्लेम सेटलमेंट करत नसल्याने ग्राहकांच्या डोक्याचा ताप वाढतो. मोठ्या आरोग्य खर्चाचा बोजा त्यांना विमा असतानाही सहन करावा लागतो. त्यामागील मोठी कारणं तरी काय?

Health Insurance म्हणजे ना-ना चा पाढा, कंपन्या का नाकारतात विम्याचा दावा
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 10:56 AM

नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : विमा कंपन्या अनेकदा विमाधारकचा आरोग्य विमा खर्चाचा दावा नाकारतात. त्यामुळे विमाधारकाचा संताप होतो. एकतर त्याला आरोग्य खर्चाचा विमा असतानाही आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. दुसरीकडे कंपनीकडून योग्य कारणं समोर येत नसल्याने तो ओरड करतो. विमा कंपनीवर नाराज होतो. त्यातून आता विमा कंपन्या बदलण्याचे प्रमाण पण वाढले आहे. पण आरोग्य विषयक माहिती लपविणे अनेकदा महागात पडत असल्याचे समोर आले आहेत. पॉलिसीबाजारनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2023 या दरम्यान देशात 2 लाखांहून अधिक आरोग्य विम्याची विक्री झाली. त्यातील 30,000 दावे नाकारण्यात आले.

या गोष्टी लपवितात ग्राहक

विश्लेषकांच्या मते, 25% आरोग्य विमा दावे नाकारण्यात येतात. त्यामागे विमा पॉलिसी खरेदी करताना ग्राहक मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्यविषयक गोष्टी लपवत असल्याचे समोर आले आहे. 25% इतर दावे न स्वीकारण्याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक व्यक्ती अटी आणि शर्तीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ओपीडी अथवा इतर उपचारांवरील खर्च मंजूर केल्या जात नाही.

हे सुद्धा वाचा

इतर उपचाराचा फटका

पॉलिसीबाजारचे प्रमुख आरोग्य विम्याचे व्यवसाय अधिकारी अमित छाबडा यांनी याविषयीचे मत मांडले. त्यानुसार, विमा पॉलिसीत उल्लेख नसलेल्या आरोग्य तक्रारी, समस्या यावर उपचार करण्यात येतो आणि त्याचा दावा दाखल करण्यात येतो. त्यामुळे कंपन्या हा खर्च नाकारतात. ओपीडी, चष्मा या खर्चासाठी पण दावे करण्यात येतात. ते नामंजूर करण्यात येतात.

ग्राहकांना नसते माहिती

अनेक ग्राहकांना विमा पॉलिसीची माहितीच नसते, असे आढळून आले. ते विमा एजंटवर अवलंबून राहतात. ते त्याच्याकडून सविस्तर माहिती घेत नाहीत. भरती होण्याची प्रक्रिया, कोणत्या रोगांवर उपचाराचा खर्च मिळतो. आरोग्य तक्रारींबाबतच्या खर्चाची माहिती, क्लेम प्रोसेस याविषयी त्यांना काहीच माहिती नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.

पैसे वाचविण्यासाठी दाव्याला नकार

सलग आठ वर्षे विमाधारक आरोग्य विम्याची रक्कम भरत असले तर त्याला एक दिलासा मिळतो. 9 व्या वर्षी नॉन डिस्क्लोसर रोगाच्या आधारावर त्याचा विमा दावा नाकारता येत नाही. विमा कंपन्यांना याविषयीचा नियम बंधनकारक असल्याचे समोर आले आहे. पण काही प्रकरणात विमा कंपन्या पैसा वाचविण्यासाठी विम्याचा दावा नाकारत असल्याचे समोर आले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.