LPG Cylinder : लाल रंगाचेच का असते गॅस सिलिंडर? काय आहे यामागील कारण..

LPG Cylinder : घरगुती गॅस सिलिंडरचा रंग नेहमी लालच का असतो. अनेकदा हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. प्रत्येक घरात आपल्याला सिलिंडर दिसते. या गॅस सिलिंडरचा रंग लाल असण्यामागचे कारण तरी काय आहे.

LPG Cylinder : लाल रंगाचेच का असते गॅस सिलिंडर? काय आहे यामागील कारण..
लाल रंगाचे माहात्म्य
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली : प्रत्येक रंगाचे वेगळे महत्व असते. काही रंग मनाला ऊर्जा देणारे, आल्हाददायक, डोळ्यांना सुखावणारे, प्रेरणा देणारे, दुःख व्यक्त करणारे असतात. काही वस्तू आपल्याला नेहमी एकाच रंगात दिसतात. आपल्या घरात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरचा (LPG Gas Cylinder) रंग नेहमी लालच असतो. पण यामागचे कारण नेमके काय असेल? हा रंग गॅस सिलिंडरचा पिच्छा का बरं सोडत नसेल? गॅस सिलिंडर नेहमी लाल (Cylinder In Red Colour) रंगातच का असते, यामागचे कारण काय असेल? यामागे एक महत्वपूर्ण शास्त्रीय कारण आहे. त्याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात.

एलपीजी गॅसचा वापर अर्थात केवळ भारतातच होतो, असे नाही तर संपूर्ण जगात एलपीजी गॅसचा वापर करण्यात येतो. एलपीजी सिलिंडरचा रंग नेहमी लालच असतो. या गॅस सिलिंडरचा रंग लाल असण्यामागे काही तरी खास कारण आहे. एलपीजी गॅस एकदम ज्वलनशील आहे. गॅसला लगेच आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच एलपीजी हा धोकादायक असतो.

विज्ञानाच्या दृष्टीने लाल रंग हा धोक्याचा संकेत देतो. त्यामुळेच एलपीजी सिलिंडर नेहमी लाल रंगाचा असतो. हा लाल रंग धोक्याचा संकेत देत असल्याने त्याचा वापर करताना ग्राहकांना नेहमी जागरुक राहण्याचा इशारा मिळतो. लाल रंग ग्राहकांना गॅस हा धोकादायक असल्याची आठवण करुन देतो. त्यामुळे त्याचा वापर करताना चूक होणार नाही आणि मोठी दुर्घटना होणार नाही.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक गॅसचा रंग वेगळा असतो. हेलियम गॅस सिलिंडरचा रंग भुरकट असतो. तर कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर राखाडी रंगाचा आणि नायट्रस ऑक्साईड गॅस सिलेंडर निळ्या रंगाचा असतो. तर एलपीजी गॅसचा सिलिंडरचा रंग लाल असतो. गॅस सिलिंडरच्या रंगावरुन त्यात कोणता गॅस जमा आहे, हे समजते.

एलपीजी सिलिंडरच्या वापरापूर्वी चुलीचा वापर करण्यात येत होता. चुलीत लाकूड, गोवरी, भूसा यांचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे धूर निघत असे. त्यामुळे स्त्रीयांना डोळे, फुफ्फुसाची समस्या होत होती. एलपीजी गॅसमुळे धूर होत नाही. स्त्रीयांच्या स्वयंपाकाचा मोठा त्रास वाचला आहे. तसेच प्रदूषणही होत नसल्याने पर्यावरणाची हानी ही टळली आहे.

केंद्र सरकार सध्या जवळपास 60 टक्के गॅसची आयात करते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सध्या 200 रुपये सबसिडी देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. ही सबसिडी करदात्यांचा पैसा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सबसिडी सोडण्यावर भर दिला. देशातील जनतेने सबसिडी सोडावी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

गेल्या दोन वर्षात सऊदी करार दर (Saudi Contract Price) 250 डॉलर प्रति मॅट्रिक टनने वाढले आहेत. या किंमती 900 डॉलर मॅट्रिक टन झाल्या आहेत. जर सऊदी करार दर 750 डॉलर प्रति मॅट्रिक टन अथवा त्यापेक्षा कमी झाल्यास घरगुती गॅस सिलिंडर किफायतशीर दरांवर विक्री करता येईल, असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.