Personal Loan: पर्सनल लोन का इतके महागडे ? कधी केलाय विचार, मग कर्ज घेताना काय घ्यावी काळजी

Personal Loan News: गृहकर्ज, वाहन कर्जापेक्षा वैयक्तिक कर्ज इतकं महागडं असतं, पण ते इतकं महागडं का असतं? चला तर समजून घेऊयात

Personal Loan: पर्सनल लोन का इतके महागडे ? कधी  केलाय विचार, मग कर्ज घेताना काय घ्यावी काळजी
महिन्याला 75000 हजारांची कमाई, सरकारचं आर्थिक पाठबळImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 5:12 PM

आर्थिक आणीबाणी (Economic crisis) ओढवल्यास तात्काळ कर्ज घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. खर्चाचे गणित बिघडलं की नियोजन चुकतं आणि साठवलेली गंगाजळीही आटते. अचानक आजारपण उद्भवल्यास, नैसर्गिक आपत्ती आल्यास अथवा अचानक संकट ओढावल्यास आपतकालीन निधी (Emergency funds) संपून जातो. तसेच अजून पैशांची गरज भासते. तेव्हा वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेणे गरजेचे ठरते. बाजारात आता वैयक्तिक कर्ज मिळणे फारशे अवघड राहिले नाही. युपीआय अॅपवर तर काही कागदपत्रे दिल्यानंतर लागलीच तुमच्या खात्यात रक्कम ही जमा होते. अथवा अनेक बँका, वित्तीय संस्था ऑनलाईन कर्ज पुरवठा करतात. यामध्येही इन्स्टंट लोन (Instant Loan) हा प्रकार असतो. तो तात्काळ तुम्हाला कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देतो. तुमच्या मागणीनुसार, अटी शर्तीसह एक ठराविक वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यात येते. पण एक गोष्ट लक्षात तुम्ही लक्षात घेतली का? वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यापैकी कुठलं कर्ज तुम्हाला महागडं मिळतं? अनेकांनी कोणतं कर्ज स्वस्त आणि कोणतं महागडं? याचा नीट विचार केला नसेल. तसं पाहता वैयक्तिक कर्ज हे सर्वात महागडे मिळते. कारण पर्सनल लोनवर तुम्हाला 10 टक्के ते 24 टक्के पर्यंत व्याज मोजावं लागतं. तर इतर कर्ज हे तुम्हाला 6.5 टक्के ते 9 टक्के व्याजदराने फेडावे लागते.

पण का असते महाग?

आता बघा वैयक्तिक कर्ज हे तुम्ही तुमच्या अति गरजेपोटी केलेली उसनवारी असते. कारण तुम्हाला आताची निकड भागवायची असते. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेता. त्यासाठी संबंधित बँकेशी, वित्तीय संस्थेशी अटी व शर्तींचे पालन करुन करारबद्ध होता. विशेष म्हणजे बँका ही अगदी जुजबी कागदपत्रांवर तुम्हाला कर्ज पुरवतात. म्हणजे केवायसीच्या आधारे कुठलीही हमी न घेता, हमीदार न घेता तुम्हाला कर्ज पुरवठा बँक करते. म्हणजे बॅक वैयक्तिक कर्जामध्ये अधिक रिस्क घेत असते. बँक एकप्रकारे तुमच्यावर जुगार खेळते. कारण सर्वचजण कर्ज वेळेवर फेडत नाहीत. अथवा गुन्हा दाखल झाला तरी बेहतर पण कर्ज परतफेड करत नाही. त्यामुळे बँका अधिकचा व्याजदर आकारतात.

हे सुद्धा वाचा

कार आणि होम लोनला सरकारचे प्रोत्साहन

खरं तर अर्थव्यवस्थेचे चक्र सदृढतेने चालवण्यासाठी कार लोन आणि होम लोनला सातत्याने प्रोत्साहन देण्यात येते. एखादी कार तुम्ही विकत घेता, तेव्हा सरकारला तब्बल 42 टक्के कर प्राप्त होतो. अर्थात जेवढ्या जास्त कारची विक्री होईल. तेवढी सरकारची आमदनी वाढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे कर्ज स्वस्त देण्यात ही बँकांमध्ये स्पर्धा लागते. होम लोनचे व्याजदर ही कमी असण्याची हीच कारणे आहेत. कारण यामुळे रोजगार वाढतो. अर्थप्रवाह सुरळीत चालतो. अर्थचक्र फिरते. त्यामुळे सरकार होम लोन आणि कार लोन घेण्यासाठी प्रोत्साहन देते. बँकाही यासंबंधीच्या जाहिराती सातत्याने प्रसारमाध्यमातून देतात. पर्सनल लोनची वेळेत परतफेड करण्याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल, तरच तुमच्यावरचा खर्चाचा अतिरिक्त ताण वाचेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.