PAN Card | कार्ड बाळगण्याची झंझट कशाला, असे करा डाऊनलोड ई-पॅन कार्ड आणि स्मार्टफोनमध्ये दाखवा स्मार्टनेस!

Mobile Wallet PAN Card | रोज वॉलेटमध्ये पॅनकार्ड बाळगण्याची गरज नाही. ही साधी युक्ती तुम्हाला स्मार्ट तर बनवेलच पण तुमची कामे ही पटकन होतील.

PAN Card | कार्ड बाळगण्याची झंझट कशाला, असे करा डाऊनलोड ई-पॅन कार्ड आणि स्मार्टफोनमध्ये दाखवा स्मार्टनेस!
e-Pan Card Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:15 AM

PAN Card Tips News | PAN Card हे आर्थिक कामासाठीच नाही तर ओळख पटवण्यासाठी ही महत्वाचे ओळखपत्र झाले आहे. अनेक सरकारी आणि निमसरकारी कामसाठी त्याचा वापर होतो. बँकेत खाते उघडणे (Bank Account) असो वा शेअर बाजारात डी-मॅट सुरु करायचे असो सर्व ठिकाणी पॅनकार्ड आवश्यक आहे. पण बऱ्याचदा पॅन कार्ड हरवण्याच्या किंवा तुमच्या विसरभोळ्या स्वभावामुळे तुम्ही पॅनकार्ड सोबत बाळगत नाहीत आणि कामांचा खोळंबा होतो. गरज असते तेव्हा पॅन कार्ड नसले की काम नाहक लांबते. अशावेळी एक ट्रिक तुमच्या उपयोगी ठरू शकते. ही स्मार्ट ट्रिक तुम्हाला पॅनकार्ड बाळगण्याच्या झंझटीतून मुक्त तर करतेच, पण तुम्हाला स्मार्ट ही बनवते. कार्ड नसले तरी तुम्ही पॅन कार्डची स्पॉफ्ट कॉपी (Soft Copy) जवळ बाळगू शकता. पॅन कार्डची PDF फोनवर डाऊनलोड करता येते आणि ते मोबाईलमध्ये जतन करता येते. जिथे पॅन कार्डची सत्यप्रत देणे आवश्यक आहे, तिथे तुम्ही ई-मेल, व्हॉट्सअपद्वारे झेरॉक्स केंद्रावर ही सत्यप्रत मिळवू शकता.

Pan Aadhar Link Last Date Over

आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही तुम्ही गमावून बसला आहात. तुमचा आळस तुम्हाला नडला म्हणावा अथवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले, जे काही असेल त्याची किंमत तुम्हाला दुप्पटीने मोजावी लागणार आहे. 30 जून ही हे दोन ओळखपत्र जोडण्याची शेवटची तारीख होती. ही अंतिम मर्यादा उलटून गेल्याने तुम्हाला जोरदार झब्बू आता सहन करावा लागणार आहे. यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत ही अंतिम मुदत (Last Date) पुढे ढकलण्यात आली होती. 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी सध्या 500 रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागणार आहेत.

ई-पॅन कार्ड असे मिळवा

https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर क्लिक करा दोन पर्याय समोर दिसतील एक्नॉलेजमेंट नंबर आणि पॅन नंबर, पॅन वर टॅप करा यानंतर तुमचा पॅन क्रमांक टाका तुमचा आधार क्रमांक टाका मग तुमची जन्मतारीख टाकावी लागेल नंतर कॅप्चा भरावा लागेल सर्व तपशील भरल्यानंतर OTP साठी सबमिट वर टॅप करा ईमेल किंवा मोबाईलवर OTP जनरेट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर OTP टाका आणि Validate वर क्लिक करा. तुमचे ई-पॅन कार्ड पीडीएफ किंवा एक्सएमएल फॉरमॅटमध्ये स्क्रीनवर येईल ते स्मार्टफोनवर डाउनलोड करा

हे सुद्धा वाचा

https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCheckCard.action या लिंकवर क्लिक करा आता 10 अंकी पॅन क्रमांक टाका जन्मतारीख MM/YYYY फॉरमॅटमध्ये टाका आता कॅप्चा एंटर करा आणि सबमिट करा. ईमेल किंवा मोबाईलवर OTP जनरेट करण्याचा पर्याय निवडा OTP प्राप्त करा वर टॅप करा OTP एंटर करा आणि सबमिट वर टॅप करा तुमचे पॅन कार्ड आपोआप डाउनलोड होईल

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.