Maternity Insurance : किती फायदेशीर मातृत्व विमा? होईल लाभ की वाया जाईल पैसा

Maternity Insurance : मातृत्व विमा किती फायदेशीर ठरु शकतो. की हे संरक्षण घेताना, नाहक वाया जाईल तुमचा पैसा, काय होऊ शकते नुकसान, जाणून घ्या..

Maternity Insurance : किती फायदेशीर मातृत्व विमा? होईल लाभ की वाया जाईल पैसा
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 11:49 AM

नवी दिल्ली : आई-वडिल होण्याचे सूख, हा वेगळाच अनुभव असतो. तो शब्दात व्यक्त करता येत नाही. एक नवीन जीवन घेऊन येणे, त्याचे संगोपन, त्याची जबाबदारी पण तितकीच महत्वपूर्ण असते. मातृत्व काळात अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आणि पुढे अनेक गोष्टी कसोशिने पाळाव्या लागतात. काही गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागतं. त्यामुळे मातृत्व विम्याची (Maternity Insurance) अनेकदा चर्चा होते. पण हा विमा किती फायदेशीर ठरतो की हे विमा संरक्षण घेताना केवळ पैसा आणि वेळेचा अपव्यव होतो, असे अनेक प्रश्न जोडप्यांना पडतात. त्याविषयी जाणून घेऊयात.

खर्च आवाक्याबाहेर आताच्या तंत्रज्ञानाआधारित आधुनिक युगात अनेक निष्णात शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, आधुनिक सोयी-सुविधा, नवीन फर्टनिटी तंत्रज्ञान दिमतीला आले आहे. वांझपणावर उपचार आले आहेत. अर्थात या सोयी-सुविधांसाठी तुम्हाला पैसा ही तसाच मोजावा लागतो. आज प्रसुतीचा, डिलिव्हरीचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. गर्भधारणेनंतर प्रसुतीपर्यंतचा मेडिकलचा खर्च ही आवाढव्य वाढला आहे. प्रसुती हा एक व्यवसाय झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये.

काय आहे मॅटर्निटी इन्शुरन्स? तर हा आवाढव्य खर्च वाचविण्यासाठी अनेक जण आता मॅटर्निटी इन्शुरसकडे वळत आहेत. यामध्ये मातृत्वासाठीचे नियमीत उपचार, तपासण्या, निदानाचा खर्च, रक्त,लघवीच्या चाचण्या, डायग्नोस्टिक टेस्ट, गर्भवती महिलांची औषधं आणि हॉस्पिटलचा खर्च या विमा कंपन्या देतात. म्हणजे या जगात येणाऱ्या इवल्याश्या जीवाच्या जन्मासी संबंधीत सर्व खर्च आणि हॉस्पिटलचा खर्च या विम्यात समाविष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

यासाठी आवश्य घ्यावा विमा

  1. मातृत्व विम्यामुळे गर्भवती महिलेला आरोग्य संरक्षण आणि सुविधा मिळण्यास मदत मिळते. मातृत्व विम्यात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीपासूनचा आणि नंतरचा खर्च समाविष्ट असतो. काही मातृत्व विम्यात पोस्ट डिस्जार्ज कव्हरेज पण मिळते. त्यातंर्गत हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतरच्या 60 दिवसांचा खर्च या योजनेतंर्गत मिळतो.
  2. मातृत्वासाठी विमा खरेदी केल्यानंतर कॅशलेस हॉस्पिटलयाझेशनची सुविधा मिळते. जर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास तुम्हाला ताबडतोब रक्कम जमा करण्याची गरज या विमा पॉलिसीमुळे पडत नाही. विमा कंपनीने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास ही सुविधा मिळते. इतर ठिकाणी दाखल झाल्यानंतर विम्याची माहिती दिल्यास, आवश्यक कागदपत्रे दिल्यास फायदा होतो.
  3. मॅटर्निटी इन्शुरन्स अंतर्गत रुग्णवाहिकेचा खर्च वाचतो. ॲम्ब्युलन्सच्या खर्च विमा योजनेत अंतर्भूत असतो. त्याविषयीची माहिती तुम्हाला विमा कंपनीकडून घेता येते.
  4. या विम्याचा कालावधीतील खर्चाची इत्यंभूत माहिती विमा कंपनी देते. याविषयी काही साशंकता असल्यास विमा खरेदीपूर्वी तुम्ही विमा कंपनी, प्रतिनिधी यांच्याशी सल्लामसलत करु शकता. त्याआधारे विमा पॉलिसीचा फायदा निश्चित होतो.

विमा कितपत फायद्याचा मातृत्वाच्या कालावधीत होणारा मोठा खर्च वाचविण्यासाठी ही पॉलिसी मदत करते. त्यासाठी अगोदर जोडप्याने त्यांचे रुग्णालय, येणारा खर्च, प्रेग्नसीतील अडचणी याचा जरुर विचार करावा. नाहीतर विमा योजना गरज नसताना घेतल्याचा पश्चाताप होईल. तसेच विमा घ्यायची आवश्यकता असल्यास इतर विमा कंपन्यांच्या योजनांशी त्याची तुलना आवश्य करा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.