एक नंबर प्रश्न; नोकरी करताना मिळेल का पेन्शन? EPS निवृत्ती वेतन मिळणार, EPFO चा नियम तरी काय?

EPS Pension : आपण आयुष्यभर नोकरी करतो. त्यादरम्यान वेतनातील एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. नोकरी पूर्ण झाली. सेवानिवृत्त झाल्यावर मग दरमहा पेन्शन देण्यात येते. ईपीएफओ या सर्व सेवांचे व्यवस्थापन करते. पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो की नोकरी करताना पेन्शन मिळू शकते का? काय आहे याचे उत्तर...

एक नंबर प्रश्न; नोकरी करताना मिळेल का पेन्शन? EPS निवृत्ती वेतन मिळणार, EPFO चा नियम तरी काय?
पेन्शन मिळणार कुणाला? किती?
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 3:45 PM

कर्मचारी पेन्शन योजना (EPS) एका निवृत्ती वेतन योजना आहे. त्याचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) करते. ही योजना संघटित क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. जे कर्मचारी 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात, त्यांच्यासाठी ही योजना आहे. EPS योजना 1995 मध्ये लागू करण्यात आली होती. या योजनेत सध्याचे आणि नवीन ईपीएफ सदस्यांचा समावेश आहे. जर एखादी व्यक्ती वयाच्या 58 व्या वर्षानंतर सुद्धा नोकरी करत असेल तर तो ईपीएस पेन्शनवर हक्क सांगू शकतो. म्हणजे तो नोकरी करता करता पेन्शन मिळवू शकतो.

पेन्शनचं असं आहे गणित

कंपनी आणि कर्मचारी दोघे पण ईपीएफ फंडात रक्कम जमा करतात. कर्मचारी त्याच्या पगारातील 12 टक्के वाटा देतो. कर्मचाऱ्याच्या अंशदानातील पूर्ण हिस्सा हा EPF मध्ये तर कंपनीच्या 12 टक्क्यातील 8.33% कर्मचारी पेन्शन स्कीममध्ये (EPS) तर 3.67% प्रत्येक महिन्यात EPF मध्ये जमा होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी अधिनियम, 1952 अंतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ईपीएस 95 योजना लागू असते.

हे सुद्धा वाचा

दहा वर्षे नोकरी करणे आवश्यक

ईपीएस पेन्शन स्कीम योजनेचा लाभ त्यांना मिळतो जे ईपीएफओचे सदस्य आहेत. EPFO च्या नियमानुसार, पेन्शन प्राप्तीसाठी कर्मचाऱ्याने सलग 10 वर्षे नोकरी करणे आवश्यक आहे. जो कर्मचारी या व्याखेत बसतो, 50 वर्षांपेक्षा वयाने अधिक असतो त्याला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळतो. जर नोकरी करण्याचा कालावधी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर निवृत्ती वेतनाची जमा रक्कम कर्मचारी केव्हाही काढू शकतो.

50 वर्षांपेक्षा कमी वय असल्यास

जर तुम्ही 10 वर्षे नोकरी पूर्ण केली. तुमचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. अशात तुम्ही नोकरी सोडली तर पेन्शन मिळणार का? तर याचे उत्तर नाही असे आहे. तुम्हाला केवळ ईपीएफमध्ये जमा केलेली रक्कम मिळेल. पेन्शनसाठी वयाची अट ही 58 वर्षांची आहे.

58 वर्षांअगोदर सोडली नोकरी तर…

एखाद्याने नोकरीत दहा वर्षे पूर्ण केले. त्याचे वय 50 ते 58 वर्षांदरम्यान असेल तर तो पेन्शन मिळण्यास पात्र असेल. पण त्याला 58 वर्षांनंतर मिळणाऱ्या पेन्शन पेक्षा कमी रक्कम मिळेल. 58 वर्षांपूर्वी तुम्ही पेन्शनसाठी क्लेम केला तर प्रत्येक वर्षी 4 टक्के दराने पेन्शनची रक्कम घटेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.