Change of Rule : क्रेडिट कार्डपासून ते ITR पर्यंत असा होईल बदल, असा पडेल फरक
Change of Rule : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून क्रेडिट कार्डच नाही तर आयटीआर, एलपीजीपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदलाचे वारे आहे. त्याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसू शकतो.
नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : जुलै महिना आता संपणार आहे. चार दिवसानंतर ऑगस्ट महिना सुरु होत आहे. 1 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलेंडर(Gas Cylinder) पासून तर इनकम टॅक्सपर्यंत, अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियमात बदल होतो. काही सेवांचे शुल्क, दर वाढतात. काही वस्तूंच्या किंमतीत बदल होतो. एलपीजी गॅस सिलेंडरपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. एक तारखेपासून नियम बदलतील (Rule Change) . त्याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसेल. सध्या आयटीआर भरण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. त्यानंतर करदात्यांवर काय परिणाम होईल. बँकांना किती दिवस सुट्या आहेत, याचा फरक पुढील महिन्यात दिसून येईल.
1 ऑगस्टपासून आयटीआर फाईलसाठी दंड
आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 31 जुलैपर्यंत करदात्यांना त्यांचा आयटीआर जमा करावा लागणार आहे. आयटीआर फाईल नाही केला तर 1 ऑगस्टपासून दंड द्यावा लागेल. आयटीआर उशीरा फाईल केल्याबद्दल करदात्याला 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड द्यावा लागेल.
या नियमानुसार दंड
31 जुलैनंतर आयटीआर फाईल केल्यास दंडाची तरतूद आहे. आयकर विभागाचा अधिनियम 1961 चे कलम 234F अंतर्गत 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना 1000 रुपयांचा दंड द्यावा लागेल.
बँकांना 14 दिवस सुट्या
ऑगस्ट महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहतील. पुढील महिन्यात सुट्यांचा पाऊस पडणार आहे. केवळ इतक्या दिवसच बँका सुरु राहतील. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनामुळे संपूर्ण देशभर या दिवशी बँका बंद असतील. याशिवाय, रक्षा बंधन, ओणम आणि इतर सणांमुळे देशातील अनेक भागातील बँकांना सुट्या असतील. त्यामुळे बँकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.
गॅस सिलेंडर भाव
मे आणि जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर धारकांना कसलाच दिसाला मिळाला नाही. 1 जुलै रोजी 14 किलोच्या गॅसच्या दरात कपात झाली नाही. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची कपात झाली होती. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक गॅसधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत कपात झाली होती. ही कपात पुढील महिन्यात पण सुरु होती.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या भावात चढउतार सुरु आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्चे तेल स्वस्त आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चा इंधनाच्या आघाडीवर दिलासा आहे. पण देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत आली नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी आहे. तेल कंपन्यांना मोठा फायदा होत आहे. लिटरमागे या कंपन्यांना 8-10 रुपयांचा फायदा होत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंधन कपातीचा चेंडू तेल कंपन्यांकडे टोलावला.