Woman Property Rights : पती आणि सासरच्या संपत्तीत पत्नीचा हक्क काय? तुम्ही जाणून घेतलंय कधी

Woman Property Rights : महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत कायद्याने आता समान अधिकार प्राप्त झाले आहे. त्यांना भावाच्या, बहिणीच्या बरोबरीने संपत्तीत वाटा मागता येतो. अथवा आपसी समझोत्याने हक्कसोड पण करता येतात. पण पतीच्या आणि सासरच्या संपत्तीत तिला काय हक्क मिळतो?

Woman Property Rights : पती आणि सासरच्या संपत्तीत पत्नीचा हक्क काय? तुम्ही जाणून घेतलंय कधी
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 10:14 AM

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : कायद्याने भारतीय महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत ( Rights of Property) समान वाटा मिळतो. त्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाच्या निकालाने आणि कायद्याने त्यांना प्राप्त झाले आहेत. काही वेळा आपसी समझोत्याने महिला त्यांचा वाटा सोडतात. त्याला हक्कसोड म्हणतात. काही महिला तर वडिलांच्या संपत्तीत हक्क पण सांगत नाही. कुटुंब एकत्र राहावे. भावाला त्रास होऊ नये यासाठी त्या मन मोठे करतात. काही ठिकाणी मात्र प्रकरण कोर्टापर्यंत जाते. पण पतीच्या आणि सासरच्या संपत्ती महिलेला किती अधिकार असतो? सासरच्या संपत्तीत (Woman Property Rights) तिला किती वाटा मिळतो? अनेकांना आजही वाटते की या संपत्तीवर पत्नीचा संपूर्ण अधिकार असतो. पण खरंच तसं आहे का?

पतीच्या संपत्तीत पत्नीचा अधिकार काय?

सर्वसाधारपणे असे मानल्या जाते की पतीच्या संपत्तीत पत्नीचा पूर्ण अधिकार असतो. पण खरंच असं असतं का? तर तसं नसतं. पत्नीसोबतच कुटुंबातील इतर लोकांचे हक्क पण सुरक्षित असतात. त्यांचा पण अधिकार असतो. पतीची कमाई असेल तर त्यात केवळ पत्नीचाच पूर्ण हक्क नसतो. त्यात आई आणि मुलांचा पण हक्क अबाधित असतो.

हे सुद्धा वाचा

वारसदाराचा अधिकार

एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी त्याचे इच्छापत्र तयार केले आणि त्यात वारस म्हणून पत्नीचे नाव घेतले, तर संपत्तीचा अधिकार तिला मिळतो. इच्छापत्र तयार न करता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, तर या संपत्तीत पत्नी, आई आणि मुलांचा समान वाटा असतो.

सासरच्या संपत्तीत किती वाटा

पतीच्या मृत्यूनंतर महिलेला पतीच्या वडिलांकडील संपत्तीवर अधिकार असतो का? तर संपूर्ण अधिकार नसतो. पण सासरकडील मंडळी महिलेला घराबाहेर काढू शकत नाही. महिलेने दावा केल्यास तिला सासरकडील मंडळीकडून पोटगी मागता येतो. सासरकडील मंडळींच्या आर्थिक स्थितीनुसार न्यायालय अशा प्रकरणात मेंटेनेंसची रक्कम ठरवते. मुलं असतील तर वडिलांच्या संपत्तीत त्यांना वाटा मिळतो. जर महिलेने दुसरे लग्न केले तर तिच्या मेंटेनेंस बंद होतो.

घटस्फोटानंतर किती अधिकार

पतीपासून विभक्त राहणे आणि घटस्फोट घेऊन वेगळे राहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. पण फारकत घेतल्यानंतरही पत्नी पतीकडून पोटगी मागू शकते. महिन्याला अथवा एकदाच सर्व रक्कम देणे, असे पोटगीचे दोन प्रकार असतात. घटस्फोटानंतर मुलं आईसोबत राहत असतील तर पतीला त्यांचा खर्च उचलावा लागतो. घटस्फोटानंतर पत्नीचा पतीच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो. पण मुलांचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असतो. एखादी संपत्ती पती-पत्नीच्या नावावर असेल तर त्यामध्ये दोघांचा समान अधिकार असतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.