Bare Minimum Monday : आठवड्याचा पहिलाच दिवस कमी ताणाचा! कामाचा नसेल कुठलाच ताण

Bare Minimum Monday : शनिवार, रविवार सलग सुट्यांच्या दिवसानंतर पहिल्याच दिवशी कामाचा कंटाळा येतो, यावर आता कंपन्यांनी जालीम तोडगा काढला आहे. तुमच्या कंपनीत सुरु झाला की नाही हा ट्रेंड

Bare Minimum Monday : आठवड्याचा पहिलाच दिवस कमी ताणाचा! कामाचा नसेल कुठलाच ताण
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 1:53 PM

नवी दिल्ली : शनिवार, रविवार सलग सुट्यांच्या दिवसानंतर पहिल्याच दिवशी कामाचा कंटाळा येतो. सलग सुट्यांचा हँगओव्हर काही केल्या उतरत नाही. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (First Day Of Week) काम करण्याचा हुरुप नसतो. पहिलाच दिवस असल्याने दांडी मारता येत नाही. कर्मचारी कार्यालयात तर येतो, पण तो थकवा घेऊनच. त्याचा कामात म्हणावा तसा मूड नसतो. यावर आता कंपन्यांनी जालीम तोडगा काढला आहे. हा उपाय सध्या ट्रेंड होत आहे. बेअर मिनिमम मंडे (Bare Minimum Monday) असे त्याला नाव देण्यात आले आहे. काय आहे हा उपाय, का होत आहे तो ट्रेंड, सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या कंपनीत सुरु झाला की नाही हा ट्रेंड..

का व्हायरल होत आहे हा ट्रेंड बेअर मिनिमम मंडे म्हणजे सोमवार पण कर्मचाऱ्यांच्या हक्काचा. या दिवशी कामाचे मोठे गाठोडं डोक्यावर घेण्याची गरज नाही. महत्वाचे आणि अत्यावश्यकच काम या दिवशी करायचे. म्हणजे अगदी कमी काम करायचे. शनिवार, रविवारी प्रवासाचा, सुट्टीचा जो थकवा आलाय, तो सोमवारी भरुन काढायचा. कामाचा ताण न घेता सोमवारी रिलॅक्स कामे करायची. या दिवशी बॉस तुम्हाला किरकोळ आणि भरमसाठ कामांची यादी समोर करुन फैलावर घेणार नाही.

भारतातही वाढला ट्रेंड तर या अनोख्या बेअर मिनिमम मंडे कार्यक्रमाचा जाहीर श्रीगणेशा ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झाला आहे. एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या मॅनेजरने त्यांच्या कार्यालयात (Workplace) हा उपाय प्रत्यक्षात अंमलात आणला. आता हा ट्रेंड भारतात पण वेगाने फैलत आहे.

हे सुद्धा वाचा

का येतो थकवा अनेक कंपन्यांमध्ये दोन दिवस सुट्या असतात. सोमवार ते शुक्रवारी त्यासाठी कंपन्यांमध्ये राब-राब राबावे लागते. शनिवारी कर्मचाऱ्याला कुटुंबियांच्या तालावर नाचावे लागते. त्याची पुरेशी झोप पण होत नाही. जवळच कुठे तरी फिरण्याची योजना असते. फॅमिली, मित्रांकडे गेट टू गेदरचा कार्यक्रम असतो. कर्मचाऱ्याचा कार्यालयीन थकवा का जात नाही. रविवारी घरातील कामे व इतर गोष्टींचा ताण असतो. कर्मचाऱ्याला वातावरण बदल मिळतो. पण त्याचा थकवा जात नाही तोच सोमवार हजर असतो. त्यामुळे सोमवारी त्याचे कामात लक्ष लागत नाही. शरीर थकल्याने कर्मचाऱ्याचा उत्साह मावळतो.

सोमवारी काय करणार बेअर मिनिमम मंडे कल्चरमध्ये सोमवारी कर्मचाऱ्याला महत्वाचीच कामे करावी लागतील. त्याच्यावर कामाचा कोणताही अतिरिक्त भार टाकण्यात येणार नाही. एडिलेड येथील एका मार्केटिंग कंपनीचा मॅनेजर केटलिन विंटर याने या संकल्पनेची पहिल्यांदा प्रभावी अंमलबजावणी केली. याविषयीचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला. मग काय विचारता राव, हा उपाय जालीम असल्याने लगेचच तो इतरांनी उचलून धरला. आता या ट्रेंडने भारतात पण बाळसे धरले आहे.

पाचही दिवस ऊर्जेचे ऑस्ट्रेलियातील अनेक कार्यालयात बेअर मिनिमम मंडे कल्चर सुरु झाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा उर्जा टिकून राहते. कार्यालयाविषयी आणि कामाविषयी आपलुकी तयार होते. कर्मचारी जोरकसपणे काम करतात. इतर दिवशी ते कामाचा कालावधी पण लक्षात घेत नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेली या संधीचे ते सोन्यात रुपांतर करत आहेत.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.