Shark Tank india : काम करणार की घर सांभाळणार? विसरा IAS, IPS बघा घरातून काढलेल्या पोरांची बिग डील

Shark Tank india : "शार्क टँक"च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका भागामध्ये स्टार्टअप सुरू केलेल्या तीन मुलांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका शैक्षणिक अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या स्टार्टअपसाठी "शार्क टँक"च्या फंड गुंतवणूकदार पॅनलने लाखो रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

Shark Tank india : काम करणार की घर सांभाळणार? विसरा IAS, IPS बघा घरातून काढलेल्या पोरांची बिग डील
शार्क टँक कार्यक्रमात सहभागी नवउद्योजक (डावीकडून) व्यंकटेश प्रसाद, सौरभ मंगरूळकर आणि राखी पल (सौ. सेट इंडिया)
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:58 AM

Shark Tank india : अनेकदा आपण स्टार्टअप (Startup) सुरू करण्याचा विचार करतो, मात्र आपल्या पुढे असा प्रश्न असतो की त्यासाठी भांडवल (Capital) कसे उभारायचे. मात्र आता त्यासाठी भारतीय टेलिव्हिजनवर देखील एक बिझनेस रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. ज्याचे नाव “शार्क टँक” (Shark tank)असे आहे. हा रिअ‍ॅलिटी शो अमेरिकन बिझनेस रिअ‍ॅलिटी शो ‘शार्क टँक’ची भारतीय आवृत्ती आहे. हा रिअ‍ॅलिटी शो ओटीपी तसेच ‘सोनी एंटरटेनमेंट’वर दाखवण्यात येतो. या शेमधून जे विद्यार्थी आपला स्वत:चा स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्यांना भांडवलाच्या उभारणीसाठी मदत करण्यात येते. मात्र त्यासाठी एक अट असते, ती म्हणजे हा स्टार्टअप या शोमध्ये फंड गुंतवणूकदारांचे जे पॅनल आहे त्यांच्या पसंतीस उतरला पाहिजे. तसेच या स्टार्टअपमधून काही तरी चांगला परतावा मिळू शकतो याबद्दल त्यांची खात्री पटली पाहिजे. या रिअ‍ॅलिटी शोच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भागात अगदी सामान्य घरातून आलेल्या तीन नवव्यवसायिकांनी भाग घेतला होता. त्यांनी एक शैक्षणिक अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप कसे कार्य करते याचे सादरीकर त्यांनी या शोमध्ये केले, त्यानंतर या शोमधील फंड गुंतवणूकदारांच्या पॅनलने त्यांना फंड देण्याचा निर्णय घेतला.

sony

शार्क टॅंक कार्यक्रमात सहभागी नवउद्योजक आणि जजेस पॅनल (सौ. सेट इंडिया)

इव्हेंट बीपची संकल्पना

सौरभ मंगरूळकर, व्यंकटेश प्रसाद आणि राखी पल असे तीन नवउद्योजक या शोमध्ये सहभागी झाले होते. या तिघांनी मिळून इव्हेंट बीप नावाचे एक शैक्षणिक अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप तीन स्टेपमध्ये काम करते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या अ‍ॅपसोबत जोडायचे आहे, त्या विद्यार्थ्यांसोबत करार केला जातो. त्यासाठी एक विशिष्ट रक्कम संबंधित विद्यार्थ्यांकडून आकारली जाते. त्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये जे विद्यार्थी या अ‍ॅपचे युजर आहेत, त्यांनी एखादी गोष्ट वेळेत केली म्हणजे होमवर्क वेळेत केला किंवा त्याच्यासारख्या अन्य गोष्टी वेळेत केल्या तर त्यांना या अ‍ॅपमध्ये काही पॉइंट देण्यात येतात. विद्यार्थांच्या खात्यात पॉइंट जमा झाल्यास त्यावर आधारित त्यांना कंपनीकडून विविध भेटवस्तू बक्षिस म्हणून देण्यात येतात. सोबतच एखाद्या विद्यार्थ्याने निवडलेल्या क्षेत्राबाबत काही समस्या असेल तर या अ‍ॅपवर त्याला तज्ज्ञाचे मार्गदर्शनदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर तिसऱ्या स्टेपमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना जॉब शोधण्यासाठी देखील हे अ‍ॅप मदत करते. इव्हेंट बीपची निर्मिती सहा महिन्यांपूर्वी एक स्टार्टअप म्हणून करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यामध्ये या अ‍ॅपने जवळपास 65 लाखांचा बिझनेस केला आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून या नवउद्योजकांना “शार्क टँक”च्या माध्यमातून लवकरच लाखो रुपयांचा फंड देखील मिळणार आहे.

व्यवसायासाठी सोडले घर

या शोमध्ये सहभागी झालेली विद्यार्थीनी राखी पल ही एका पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबामधून आली आहे. तिच्या कुटुंबाला मुलींनी बिझनेस किंवा व्यवसाय करावा हे मान्य नाही. त्यांनी तिच्यापुढे दोनच पर्याय ठेवले होते, घर किंवा व्यवसाय. व्यवसायाची निवड केल्यास तीला घर सोडावे लागणार होते. तरी देखील राखीने रिस्क घेत आपले घर सोडले. आपल्या स्टार्टअपसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, आज सहा महिन्यानंतर त्याचे फळ तिला दिसत आहे. राखी प्रमाणेच अन्य दोघे सौरभ मंगरूळकर आणि व्यंकटेश प्रसाद हे देखील सामान्य कुटुंबातून आले आहेत. पण भविष्यात एक मोठे उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. शार्क टॅंककडून त्यांच्या या स्वप्नला बळ मिळाले आहे. सोनीवरचा हा एपिसोड पाहण्यासारखा आहे. यावेळी तिघांनी घेतलेल्या एकूण मेहनतीविषयी सविस्तर सांगितले. तसेच दिवार चित्रपटातले डॉयलॉग्स म्हणत मनोरंजनही केले.  (Video Courtesy – SET India)

संबंधित बातम्या

EPFO योजना : खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ, महिना 15-30 हजार पेन्शन

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

अर्थव्यवस्था जोमात! या वर्षात विकासाचा दर 7.8 टक्के राहणार; सर्वांचे आराखडे धुळीस मिळवत रिझर्व्ह बँकेचा अंदाज

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.