Shark Tank india : अनेकदा आपण स्टार्टअप (Startup) सुरू करण्याचा विचार करतो, मात्र आपल्या पुढे असा प्रश्न असतो की त्यासाठी भांडवल (Capital) कसे उभारायचे. मात्र आता त्यासाठी भारतीय टेलिव्हिजनवर देखील एक बिझनेस रिअॅलिटी शो सुरू झाला आहे. ज्याचे नाव “शार्क टँक” (Shark tank)असे आहे. हा रिअॅलिटी शो अमेरिकन बिझनेस रिअॅलिटी शो ‘शार्क टँक’ची भारतीय आवृत्ती आहे. हा रिअॅलिटी शो ओटीपी तसेच ‘सोनी एंटरटेनमेंट’वर दाखवण्यात येतो. या शेमधून जे विद्यार्थी आपला स्वत:चा स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्यांना भांडवलाच्या उभारणीसाठी मदत करण्यात येते. मात्र त्यासाठी एक अट असते, ती म्हणजे हा स्टार्टअप या शोमध्ये फंड गुंतवणूकदारांचे जे पॅनल आहे त्यांच्या पसंतीस उतरला पाहिजे. तसेच या स्टार्टअपमधून काही तरी चांगला परतावा मिळू शकतो याबद्दल त्यांची खात्री पटली पाहिजे. या रिअॅलिटी शोच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भागात अगदी सामान्य घरातून आलेल्या तीन नवव्यवसायिकांनी भाग घेतला होता. त्यांनी एक शैक्षणिक अॅप तयार केले आहे. हे अॅप कसे कार्य करते याचे सादरीकर त्यांनी या शोमध्ये केले, त्यानंतर या शोमधील फंड गुंतवणूकदारांच्या पॅनलने त्यांना फंड देण्याचा निर्णय घेतला.
सौरभ मंगरूळकर, व्यंकटेश प्रसाद आणि राखी पल असे तीन नवउद्योजक या शोमध्ये सहभागी झाले होते. या तिघांनी मिळून इव्हेंट बीप नावाचे एक शैक्षणिक अॅप तयार केले आहे. हे अॅप तीन स्टेपमध्ये काम करते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या अॅपसोबत जोडायचे आहे, त्या विद्यार्थ्यांसोबत करार केला जातो. त्यासाठी एक विशिष्ट रक्कम संबंधित विद्यार्थ्यांकडून आकारली जाते. त्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये जे विद्यार्थी या अॅपचे युजर आहेत, त्यांनी एखादी गोष्ट वेळेत केली म्हणजे होमवर्क वेळेत केला किंवा त्याच्यासारख्या अन्य गोष्टी वेळेत केल्या तर त्यांना या अॅपमध्ये काही पॉइंट देण्यात येतात. विद्यार्थांच्या खात्यात पॉइंट जमा झाल्यास त्यावर आधारित त्यांना कंपनीकडून विविध भेटवस्तू बक्षिस म्हणून देण्यात येतात. सोबतच एखाद्या विद्यार्थ्याने निवडलेल्या क्षेत्राबाबत काही समस्या असेल तर या अॅपवर त्याला तज्ज्ञाचे मार्गदर्शनदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर तिसऱ्या स्टेपमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना जॉब शोधण्यासाठी देखील हे अॅप मदत करते. इव्हेंट बीपची निर्मिती सहा महिन्यांपूर्वी एक स्टार्टअप म्हणून करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यामध्ये या अॅपने जवळपास 65 लाखांचा बिझनेस केला आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून या नवउद्योजकांना “शार्क टँक”च्या माध्यमातून लवकरच लाखो रुपयांचा फंड देखील मिळणार आहे.
या शोमध्ये सहभागी झालेली विद्यार्थीनी राखी पल ही एका पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबामधून आली आहे. तिच्या कुटुंबाला मुलींनी बिझनेस किंवा व्यवसाय करावा हे मान्य नाही. त्यांनी तिच्यापुढे दोनच पर्याय ठेवले होते, घर किंवा व्यवसाय. व्यवसायाची निवड केल्यास तीला घर सोडावे लागणार होते. तरी देखील राखीने रिस्क घेत आपले घर सोडले. आपल्या स्टार्टअपसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, आज सहा महिन्यानंतर त्याचे फळ तिला दिसत आहे. राखी प्रमाणेच अन्य दोघे सौरभ मंगरूळकर आणि व्यंकटेश प्रसाद हे देखील सामान्य कुटुंबातून आले आहेत. पण भविष्यात एक मोठे उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. शार्क टॅंककडून त्यांच्या या स्वप्नला बळ मिळाले आहे. सोनीवरचा हा एपिसोड पाहण्यासारखा आहे. यावेळी तिघांनी घेतलेल्या एकूण मेहनतीविषयी सविस्तर सांगितले. तसेच दिवार चित्रपटातले डॉयलॉग्स म्हणत मनोरंजनही केले. (Video Courtesy – SET India)
EPFO योजना : खासगी नोकरदारांनाही पेन्शनचा लाभ, महिना 15-30 हजार पेन्शन
शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी