जगातील सर्वाधिक महाग ‘एलपीजी’ भारतामध्ये; तो कसा? समजून घ्या त्यामागचे गणित
जगात सर्वात महाग गॅस कोणत्या देशात मिळतो? तर त्याचे उत्तर भारत असे आहे. भारतामध्ये एलपीजीचे दर सर्वाधिक आहेत ते कसे पाहूयात. जगातील सर्वात महाग एलपीजी भारतात कसा याचे उत्तर चलनांच्या क्रयशक्तीनुसार मोजले तर मिळेल.
भारतात महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पेट्रोल (Petrol) , डिझेल (Diesel), सीएनजी, गॅस अशा सर्वच इंधनाच्या प्रकारामध्ये मोठी वाढ झाली आहे. इंधनामध्ये झालेल्या दरवाढीमुळे सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. जगात सर्वात महाग गॅस कोणत्या देशात मिळतो? तर त्याचे उत्तर भारत असे आहे. भारतामध्ये एलपीजीचे दर सर्वाधिक आहेत ते कसे पाहूयात. जगातील सर्वात महाग एलपीजी भारतात कसा याचे उत्तर चलनांच्या क्रयशक्तीनुसार मोजले तर मिळेल. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. देशात केवळ एलपीजीच नव्हे तर पेट्रोल आणि डिझेल देखील महाग झाले आहे. पेट्रोलच्या महागाईत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत, तर डिझेलच्या महागाईमध्ये आपण आठव्या क्रमांकावर आहोत.
पैशांची क्रयशक्ती कशी काम करते?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कोणत्याही चलनाची क्रयशक्ती ही त्याच्या किमतीवरून ठरते. म्हणजेच काय तर आपला भारतीय रुपयांचे मुल्य हे नेपाळी चलनापेक्षा जास्त आहे. भारतात रुपयामध्ये जेवढ्या वस्तू येतात, त्यापेक्षा अधिक वस्तू या आपन नेपाळमध्ये खरेदी करू शकतो. मात्र तेच जर अमेरिकेबाबत बोलायचे झाल्यास डॉलरची किंमत ही रुपयापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने आपण अमेरिकेत रुपयामध्ये काहीही खरेदी करू शकणार नाही. यालाच चलनाची क्रयशक्ती किंवा खरेदी शक्ती असे देखील म्हणतात.
जगातील सर्वात महाग एलपीजी भारतात कसा?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जगभरातील चनांमध्ये होणारा कोणताही व्यापार हा नाममात्र विनिमय दराने केला जातो. त्यानुसार देशाच्या चलनाची क्रयशक्ती ठरवली जाते. प्रत्येक देशातील लोकांच्या उत्पन्नमध्ये तसेच लागणाऱ्या खर्चामध्ये तफावत असते. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी खरेदीसाठी भारतीय लोकांना त्यांच्या दैनंदीन उत्पन्नातील एक चतुर्थांश हिस्सा खर्च करावा लागोत, तर अमेरिकेतील नागरिकांना त्यांच्या दैनंदीन उत्पन्नातील केवळ एक हिस्सा इंधन खरेदीवर खर्च करावा लागतो. या सुत्रानुसार जगातील सर्वात महाग एलपीजी भारतात मिळतो.
संबंधित बातम्या
रामदेव बाबांना आले ‘अच्छे दिन’ रुची सोयाने फेडलं 3000 कोटींचं कर्ज
12 वर्षांखालील मुलांसाठी LIC ची नवी पॉलिसी, दिवसाला 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करा…